Lokmat Money > बिझनेस न्यूज > Jeff Bezos यांना मागे टाकत Bernard Arnault कसे बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय आहे त्यांचा बिझनेस?

Jeff Bezos यांना मागे टाकत Bernard Arnault कसे बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय आहे त्यांचा बिझनेस?

फोर्ब्सच्या माहितीनुसार, Bernard हे यापूर्वीही तीन वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ते डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि मे 2021 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 12:28 PM2021-08-09T12:28:30+5:302021-08-09T12:28:51+5:30

फोर्ब्सच्या माहितीनुसार, Bernard हे यापूर्वीही तीन वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ते डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि मे 2021 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

How Bernard arnault became the richest man in the world What is their business | Jeff Bezos यांना मागे टाकत Bernard Arnault कसे बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय आहे त्यांचा बिझनेस?

Jeff Bezos यांना मागे टाकत Bernard Arnault कसे बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय आहे त्यांचा बिझनेस?

प्रदीर्घ काळापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर राहणारे Amazon चे फाउडंर Jeff Bezos यांची बादशाही आता संपुष्टात आली आहे. त्यांची बादशाही Louis Vuitton कंपनीचे सर्वेसर्वा Bernard Arnault यांनी संपवली आहे. Bernault  Arnault यांनी Jeff Bezos यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकूट मिळवला आहे. सध्या Bernard  फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या  स्थानावर आहेत. (How Bernard arnault became the richest man in the world What is their business)

Bernard कसे बनले एवढे श्रीमंत?
Bernard Arnault हे आपल्या Louis Vuitton कंपनीमुळेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या काही काळापासून या कंपनीचा बिझनेस मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे या कंपनीचे शेअर्सदेखील वधारले आहेत. यामुळे कंपनीची व्हॅल्यूदेखील वाढली आहे. याचाच फायदा कंपनीचे मालक Bernard Arnault यांना झाला आहे. 

या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी

काय आहे Bernard यांचा बिझनेस?
Bernard Arnault यांच्या मालकीची Louis Vuitton ही फ्रान्सची कंपनी आहे. ही कंपनी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. Louis Vuitton कपडे, कॉस्मेटिक्स, फॅशन अॅसेसरीज, घड्याळ, पर्फ्यूम, दागिने, वॉइन, पर्स आदि प्रोडक्ट तयार करते. या कंपनीचे प्रोडक्ट्स संपूर्ण जगातच प्रसिद्ध आहेत. ही कंपनी जगातील काही प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे.

Bernard यांची एकूण संपत्ती किती?
फोर्ब्सच्या यादीनुसार, जगातील नवे सर्वात श्रीमंत व्यक्ती Bernard Arnault यांची एकूण संपत्ती 19,890 कोटी डॉलर एवढी आहे. तर आता Bernard यांच्या मागे पडलेल्या Jeff Bezos यांची एकूण संपत्ती 19,490 कोटी डॉलर एवढी असल्याचे सांगण्यात आले आहे.

यापूर्वीही Bernard बनले आहेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती -
फोर्ब्सच्या माहितीनुसार, Bernard हे यापूर्वीही तीन वेळा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. ते डिसेंबर 2019, जानेवारी 2020 आणि मे 2021 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

Web Title: How Bernard arnault became the richest man in the world What is their business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.