Lokmat Money > बिझनेस न्यूज > LPG Cylinder : आता 'या' नवीन पद्धतीने LPG सिलिंडर त्वरित बुक करा, खूप सोपी आहे प्रक्रिया...

LPG Cylinder : आता 'या' नवीन पद्धतीने LPG सिलिंडर त्वरित बुक करा, खूप सोपी आहे प्रक्रिया...

LPG cylinder : तुम्ही तुमचे एलपीजी सिलिंडर आयपीपीबी (IPPB) मोबाइल बँकिंग अॅपद्वारे (LPG gas cylinder via the IPPB mobile banking app) देखील बुक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 04:46 PM2021-12-09T16:46:37+5:302021-12-09T16:48:24+5:30

LPG cylinder : तुम्ही तुमचे एलपीजी सिलिंडर आयपीपीबी (IPPB) मोबाइल बँकिंग अॅपद्वारे (LPG gas cylinder via the IPPB mobile banking app) देखील बुक करू शकता.

How to book LPG gas cylinder online using IPPB mobile banking app | LPG Cylinder : आता 'या' नवीन पद्धतीने LPG सिलिंडर त्वरित बुक करा, खूप सोपी आहे प्रक्रिया...

LPG Cylinder : आता 'या' नवीन पद्धतीने LPG सिलिंडर त्वरित बुक करा, खूप सोपी आहे प्रक्रिया...

नवी दिल्ली : सध्या एलपीजी सिलिंडरचे (LPG cylinder) बुकिंग लगेच होते. डिजिटल युगात अनेक पर्याय आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या घरातूनच आरामात फक्त एका बटणावर क्लिक करून गॅस सिलिंडर बुक करू शकता. विशेष म्हणजे, इंडेन गॅस, एचपी गॅस आणि भारत गॅस या सर्वांच्या स्वतःच्या ऑनलाइन एलपीजी बुकिंग सेवा आहेत, ज्यामुळे ग्राहकांना गॅस डीलरशीपला कॉल करण्याचा किंवा भेट देण्याच्या त्रासाशिवाय एलपीजी सिलिंडर रिफिल बुक करता येते.

तुम्ही तुमचे एलपीजी सिलिंडर आयपीपीबी (IPPB) मोबाइल बँकिंग अॅपद्वारे (LPG gas cylinder via the IPPB mobile banking app) देखील बुक करू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने  (India Post Payments Bank) ट्विट केले आहे की, "IPPB त्यांच्या मोबाइल बँकिंग अॅपवरून LPG गॅस सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग सुलभ आणि सुरक्षित करते."

शेअर केला आहे 'हा' व्हिडीओ...
आयपीपीबीने आपल्या ट्विटसह एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये अॅपच्या माध्यमातून एलपीजी सिलिंडर ऑनलाइन करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस सांगितले आहे. गॅस सिलिंडर बुक करण्याचा सोपा मार्ग शोधत आहात? काळजी करू नका आणि IPPBOnline मोबाइल बँकिंग अॅप वापरून, या सोप्या स्टेप्स फॉलो करा...

बुकिंगसाठी फॉलो करा या स्टेप्स...
- आयपीपीबी मोबाइल बँकिंग अॅप डाउनलोड करा.
- लॉग इन करा आणि पे बिलवर क्लिक करा, एलपीजी सिलिंडर निवडा.
- तुमचा बिलर निवडा, ग्राहक/वितरक/एलपीजी आयडी आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर द्या.
- Get Bill वर क्लिक करा, पेमेंट पद्धत निवडा. पेमेंट, कन्फर्म आणि पे वर क्लिक करा आणि मिळालेला ओटीपी एंटर करा.
- तुमचे एलपीजी सिलिंडर बुकिंग यशस्वी झाले आहे आणि तुम्हाला एक कंफर्मेशन एसएमएस प्राप्त होईल.
— अन्य चॅनेलद्वारे केलेल्या बुकिंगसाठी, अॅपमधील स्कॅन आणि पेमेंट पर्याय वापरून पेमेंट केले जाऊ शकते.

Web Title: How to book LPG gas cylinder online using IPPB mobile banking app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.