जर तुम्ही एखादा लहान व्यवसाय करत असाल तर तुम्हाला बँकेकडे कर्ज मागण्यासाठी जाण्याची गरज नाही. तुम्ही सोशल मीडियासारख्या वापराने तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्ही फेसबुककडून देखील ५० लाखांपर्यंतचे कर्ज काढू शकता. महत्वाचे म्हणजे फेसबुक देशातील ३००हून छोट्या शहरांमध्ये हे कर्ज उपलब्ध करत आहे. यासाठी काही अटी आहेत. त्या जाणून घ्या.
लहान व्यापारी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी फेसबुकचा अधिकाधिक वापर करावा म्हणून फेसबुकने हे पाऊल उचलले आहे. फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटा किंवा फेसबुक हे कर्ज व्यापाऱ्यांना देत नाही, तर माध्यम बनले आहे. यासाठी फेसबुकने Indifi सोबत पार्टनरशीप केली आहे.
फेसबुकने या कर्जासाठी दोन साध्या अटी ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या सेवा नेटवर्कसह भारतीय शहरात असावा. कंपनीने यापूर्वी भारतातील 200 शहरांमध्ये ही सेवा सुरू केली होती, आता ती 329 शहरांमध्ये ही सेवा देते. तुम्ही येथे क्लिक (https://www.facebook.com/business/small-business-loans) करून ही यादी तपासू शकता. दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अॅपशी किमान गेल्या ६ महिन्यांपासून कनेक्ट आहात आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करत आहात. याशिवाय, IndiFi च्या काही अटी आहेत, ज्या तुम्ही वरील लिंकवर पाहू शकता.
यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही अगदी सोपी आहे, यासाठी तुम्हाला फेसबुक स्मॉल बिझनेस लोन्स इनिशिएटिव्हच्या पेजला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
तीन दिवसांत सारे काही...
फेसबुकच्या या उपक्रमामुळे तुम्ही 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तुमचे कर्ज मंजूर झाल्यास, तुम्हाला तीन दिवसांत तुमच्या खात्यात पैसे मिळतील. अर्ज करताना तुम्हाला काहीही गहाण ठेवावे लागणार नाही. तसेच, या कर्जाचा व्याजदर आधीच निश्चित केलेला आहे, जो कोणत्याही रकमेसाठी 17 ते 20 टक्के वार्षिक असेल. एवढेच नाही तर कंपनी महिला उद्योजकांना ०.२ टक्के कमी व्याजदराने हे कर्ज देणार आहे. जर तुमचे कर्ज मंजूर करायचे असेल तर तुम्हाला फक्त एका दिवसात कन्फर्मेशन मिळेल. उर्वरित कागदपत्रांचे काम अवघ्या तीन दिवसांत होईल.