Zerodha Nithin Kamath News: आजकाल अनेक जण गुंतवणूकीकडे वळताना दिसतायत. परंतु अधिक नफ्याच्या मोहामायी अनेक जण आपला पैसा गमावून बसतात. दरम्यान, झिरोदाचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामथ यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. "श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. श्रीमंत व्हायचं असेल तर संयम आणि शिस्त बाळगा. वायफळ खर्च कमी करा, गुंतवणुकीला सुरुवात करा. आपत्कालीन आणि आरोग्य निधी तयार करण्याची खात्री करा. केवळ खर्च करण्यापेक्षा आपल्या पगाराचा वापर बचत आणि गुंतवणुकीसाठी करा," असं कामथ म्हणाले. 'मिडल क्लास ट्रॅप' लोकांना अशा प्रकारे अडकवून ठेवतो ज्यातून सुटणं अवघड होतं, असेही ते म्हणाले.
कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "मला अनेकदा लोक स्टॉक टिप्स किंवा त्यांना श्रीमंत बनवतील अशी कोणतीही गोष्ट विचारतात. परंतु सत्य हे आहे की श्रीमंत होण्याचा कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी चांगल्या सवयी आणि संयमाची गरज असते. लोकांनी गरज नसलेल्या वस्तू खरेदी करू नयेत आणि त्याहीपेक्षा जास्त कर्ज घेऊन खरेदी करू नये," असं ते म्हणाले.
दिवसाला १० लाख देण्यासाठी तयार होती 'ही' कंपनी; पण विराट बनला नाही ब्रँड अॅम्बेसेडर, कारण काय?
मिडल क्लास फंडिंग म्हणजे काय?
कामथ यांनी 'Zero1byZerodha'चा एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात प्रतीक सिंह म्हणतात की का लोक कठोर परिश्रम करा, नोकरी मिळवा, कर्ज घ्या घर खरेदी करा आणि दिखाव्यावर पैसे उडवण्याच्या या चक्रव्यूहात का अडकले आहेत. सिंग याला 'निरुपयोगी सल्ला' म्हणतात आणि त्यातून बाहेर पडणं कठीण असल्याचं सांगतात. त्यांच्या मते, समस्येचं मूळ हे आहे की लोक त्यांच्या पगाराकडे केवळ खर्चासाठी पाहतात, बचत किंवा गुंतवणुकीसाठी नाही.
I often get asked for a stock tip, something that will make people rich. 😬
— Nithin Kamath (@Nithin0dha) April 10, 2025
Unfortunately, there are no shortcuts to getting rich. It takes good habits and patience. Things like buying stuff you don't need, or worse, borrowing to buy them. The other big one is not having health… pic.twitter.com/qWYaDuhZKe
मध्यमवर्गीयांच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं?
१. खर्चात कपात करा आणि गुंतवणुकीला सुरुवात करा. प्रत्येक महिन्याचा खर्च लिहा. वायफळ खर्च कमी करा आणि फक्त १% पैसे काढा आणि इंडेक्स फंडासारख्या साधनात गुंतवणूक करा.
२. आपत्कालीन निधी तयार करा. कमीत कमी ६ महिन्यांचे पैसे वाचवा. उदाहरणार्थ, जर तुमचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल तर १.८ लाख रुपये जमा करा जेणेकरून तुम्ही नोकरी गमावली तरी आरामात जगू शकाल.
३. आरोग्य विमा नक्की घ्या. हल्ली हॉस्पिटलची बिलं गगनाला भिडत आहेत, त्यामुळे आरोग्य विम्याशिवाय जोखीम घेऊ नका.
४. लोभात पडू नका, शिस्त लावा. झटपट परताव्याच्या शोधात पैसे वाया घालवू नका. नियमित गुंतवणूक करा आणि वेळेसोबत पैसे वाढू द्या.