आजच्या काळात बहुतांश लोकांकडे आपलं वाहन आहे. तुमच्याकडेही दुचाकी किंवा चारचाकी वाहन असेल तर तुम्हीही त्याचा इन्शूरन्स काढलाच असेल. इन्शूरन्स पॉलिसी काढताना, बरेच लोक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी (Comprehensive Insurance) घेण्यास प्राधान्य देतात. यामध्ये तुम्हाला अपघातामुळे झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई मिळू शकते. भूकंप, पूर, चोरी, आग यांसारख्या आपत्तींमुळे थर्ड पार्टी तसेच तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानीसाठी विमा पॉलिसी कव्हरेज प्रदान करते.
परंतु विमा कंपनी तुमच्या वाहनाच्या झालेल्या नुकसानीसाठी किती रक्कम देईल, हे तुमच्या वाहनाच्या IDV (Insured Declared Value) वर अवलंबून असतं. कॉम्प्रिहेन्सिव विमा घेत असताना, विमा कंपनी तुमच्या वाहनाच्या बाजार मूल्याचं मूल्यांकन करते. हे मूल्य IDV म्हणून रेकॉर्ड केले जाते. पण कोणतीही कंपनी कोणत्या आधारावर वाहनाचा आयडीव्ही ठरवते? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पाहूया काय आहे याचं उत्तर.
कोणत्या आधारावर ठरवलं जातं?IDV निश्चित करण्यासाठी एक निश्चित सूत्र देखील आहे. जेव्हा एखादी कार नवीन असते, तेव्हा तिची किंमत शोरूमच्या किमतीएवढी ठेवली जाते, परंतु कार जितकी जुनी होईल तितका त्याचा फरक पडत जातो. त्याच आधारावर, त्याचे IDV नंतर ठरवले जाते. IDV ठरवताना, वाहनाचं वर्ष, महिना, मॉडेल इत्यादी सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार मूल्य काढलं जातं.
- साधारणपणे, 6 महिने जुन्या वाहनाची IDV शोरूमच्या किमतीपेक्षा 5 टक्के कमी म्हणजे 95 टक्के निश्चित केला जाईल.
- वाहन 6 महिने ते एक वर्ष जुनं असल्यास, IDV शोरूम किमतीपेक्षा 15 टक्क्यांनी कमी असेल.
- 1 वर्ष ते 2 वर्षांच्या जुन्या वाहनांसाठी, शोरूम किंमतीपेक्षा 20 टक्के कमी आयडीव्ही ठरवली जाते.
- 2 वर्षे ते 3 वर्षे वापरलेल्या वाहनाचा IDV शोरूम किमतीपेक्षा 30 टक्के कमी ठेवला जातो.
- 3 वर्षे ते 4 वर्षे वापरलेल्या वाहनाचा IDV शोरूम किमतीपेक्षा 40 टक्के कमी म्हणजे शोरूम किमतीच्या 60 टक्क्यांपर्यंत निश्चित केला जातो.
- 4 वर्षे ते 5 वर्षे वापरलेल्या वाहनाचा IDV शोरूमच्या किमतीपेक्षा 50 टक्क्यांइतका असतो.
- 5 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी, IDV बाजार मूल्य, त्याची सर्व्हिसिंग स्थिती आणि बॉडी पार्ट्सवर निर्धारित केले जाते. मुख्यतः या प्रकरणात वाहनाची किंमत विमा कंपनी आणि ग्राहक यांच्या संमतीनं निश्चित केली जाते.
IDVची गरज का?
विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी IDV आवश्यक आहे. किंबहुना, जेव्हा वाहनाची चोरी किंवा मोठं नुकसान झाल्यास भरपाईचा विचार केला जातो तेव्हा ग्राहकाला भरपाई म्हणून अधिक रक्कम हवी असते आणि कंपनीला कमीत कमी भरपाई द्यायची असते. अशा परिस्थितीत प्रकरण गुंतागुंतीचं होऊ शकतं. त्यामुळे, आयडीव्हीच्या स्वरूपात वाहनाचं मूल्य विम्याच्या वेळी निश्चित केलं जातं. सध्याच्या बाजारभावाच्या आधारे वाहनाची किंमत ठरवली जाते. अशा परिस्थितीत, जेव्हा विमा क्लेम करण्याची वेळ येते तेव्हा कोणताही वाद होत नाही आणि प्रकरण सहजतेनं मिटवलं जातं.