Join us

Reliance Jio सोबत मिळणार घरबसल्या पैसे कमवण्याची संधी; फक्त करावं लागेल 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 5:05 PM

पाहा यासाठी काय करावं लागेल

ठळक मुद्देरिलायन्सनं गेल्या वर्षी Jio POS Lite सेवा केली होती लाँचJio POS Lite द्वारे दुसऱ्यांचं रिचार्ज करून कंपनीकडून मिळतं कमिशन

सध्या अशा अनेक पद्धती आहेत ज्यांच्या मदतीनं घरबसल्या पैसे कमवता येतात. परंतु आता रिलायन्स जिओनंदेखील घरबसल्या पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. Jio POS Lite या सेवेद्वारे ग्राहकांना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिलायन्स जिओनं Jio POS Lite ही सेवा गेल्या वर्षी लाँच केली होती. हे अॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवरदेखील उपलब्ध आहे. Jio POS Lite एक कम्युनिटी रिचार्ज अॅप आहे. या अॅपद्वारे दुसऱ्यांचंही रिचार्ज करणं शक्य आहे. याद्वारे रिचार्ज केल्यास ४.१६ टक्के कमिशनही देण्यात येतं. जर तुम्ही एखाद्याचं १०० रूपयांचं रिचार्ज केलं तर तुम्हासा कमिशन म्हणून ४ रूपये मिळतील. जर या द्वारे कमाई करायची असेल तर पहिल्यांदा Jio POS Lite हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. नंतर त्यात विचारण्यात आलेली माहिती भरून रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडून जिओ क्रमांक आणि ईमेल आयडी विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला रिचार्ज पार्टनरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ओटीपीवर क्लिक करून आलेला ओटीपी एन्टर करावा लागेल. टर्म्स अँड कंडिशन्स टीक करून कंटिन्यू करून लॉगिन करत आलेला ओटीपीही व्हॅलिडेट करावा लागणार आहे. त्यानंतर mPIN तयार करून सेटअप सुरू होईल. त्यानंतर कोणत्याही अन्य व्यक्तीचा मोबाईल रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला रिचार्ज ऑप्शन क्लिक करावं लागेल. यासाठी तुमच्या खात्यात कमीतकमी ५०० रूपये असणं आवश्यक आहे. तसंत एका दिवसात जास्तीतजास्त ५ हजार रूपये अॅड करता येतील. 

टॅग्स :रिलायन्स जिओरिलायन्समोबाइलपैसा