सप्टेंबरमध्ये वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलन गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढले. गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५ टक्क्यांनी जीएसटी संकलन वाढल्याची नोंद आहे. या वाढीचा अर्थ समजून घेऊ या...
संकलनाचा वाटा
केंद्र - २०,७५८ कोटी
राज्य - २६,७६७ कोटी
वाढीतून काय निदर्शनास येते?
- जीएसटी संकलनात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपासून वाढ होण्यास सुरुवात झाली.
- दुसऱ्या तिमाहीत मासिक जीएसटी संकलन सरासरी १ लाख १५ हजार कोटी रुपये आहे.
- कोरोनाकहरातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे ते द्योतक आहे.
- खोटी जीएसटी बिले सादर करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचाही हा परिणाम आहे.
- जीएसटी संकलनातील वाढीचा हा कल आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन तिमाहींमध्येही कायम राहील, असा अंदाज आहे.
‘जीएसटी’महसूल वाढ ही चिंतेची बाब आहे?
कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागलेला असताना ‘जीएसटी’ संकलनात वाढ होऊ लागली आहे. मात्र, जीएसटी संकलनात झालेली वाढ ही चिंतनीय असल्याचे मानले जात आहे. याला कारण म्हणजे राज्यांना झालेला महसुली तोटा भरून देण्यासाठी त्यांना ‘जीएसटी’ संकलनातील वाटा देणे केंद्रासाठी बंधनकारक आहे. जून, २०२२ पर्यंत ही मर्यादा आहे. २०१७ मध्ये ‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर पाच वर्षे केंद्राकडून राज्यांना वाटा दिला जाणार आहे.