Join us

टॉयलेटचे पाणी विकून नागपूरला मिळतात ३०० कोटी; नितीन गडकरींनी सांगितली आयडिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:04 IST

Toilet Water : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे कल्पक विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले, की सरकार टॉयलेटच्या पाण्यातून दरवर्षी ३०० कोटी रुपयांची कमाई करत आहे.

Toilet Water : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या युनिक आयडियांमुळे कायम चर्चेत असतात. प्लास्टीक कचऱ्यापासून महामार्ग तयार करायची कल्पनाही त्यांनी प्रत्यक्षातही उतरवली आहे. यात सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा वाचला. पुन्हा एकदा गडकरी अशाच एका अनोख्या प्रयोगामुळे चर्चेत आले आहेत. टॉयलेटच्या पाण्यातून नागपूर शहराला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. काय आहे नेमका हा प्रयोग? याविषयी नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे.

मथुरात पहिला प्रयोगगडकरी यांनी नुकतेच येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली. शौचालयाच्या पाण्यापासून पैसे कमविण्याचा पहिला प्रकल्प उत्तर प्रदेशातील मथुरा येथे सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे घाण पाण्यावर प्रक्रिया करण्यात आली. हे पाणी आम्ही इंडियन ऑइलच्या मथुरा रिफायनरीला (IOC) २० कोटी रुपयांना विकले. गडकरी म्हणाले की, सरकारने या प्रकल्पात ४०% गुंतवणूक केली आहे. तर गुंतवणूकदारांनी ६०% गुंतवणूक केली. ते म्हणाले, “मथुरेत ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) गलिच्छ पाणी होते. मी जलसंपदा मंत्री असताना आम्ही हा प्रकल्प सुरू केला.

इंडियन ऑईलशी कशी केली डील?ते पुढे म्हणाले, "मी इंडियन ऑइलच्या अध्यक्षांना विचारले, तुम्हाला किती पाणी हवे आहे? अध्यक्षांनी सांगितले की आम्ही उत्तर प्रदेश सरकारकडून पाणी विकत घेत असून यासाठी दरवर्षी २५ कोटी रूपये मोजतो. यावर गडकरी म्हणाले, इतकेच शुद्ध पाणी आम्ही २० कोटी रुपयांमध्ये देतो. कंपनीने डील मान्य केली. यात कंपनी आणि सरकार दोन्हींना फायदा झाला.

वाचा - गुगल-अ‍ॅमेझॉनच्या कोट्यवधी रुपयांवर सरकार सोडणार पाणी? काय आहे समानीकरण शुल्क?

नागपूरमध्ये ३०० कोटी रुपयांची कमाईपुढे हा प्रयोग नागपूर शहरात राबवण्यात आला. "तुमचा विश्वास बसणार नाही, आम्ही शौचालयाचे पाणी विकून दरवर्षी ३०० कोटी रुपये कमावतो. प्रत्येक शहरातील उद्योगांनी या पाण्याचा पुनर्वापर करून त्याचा वापर केल्यास कचरा व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे करता येईल.", असेही गडकरी यांनी सांगितले. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असेल असेही ते म्हणाले. "काच, धातू, प्लॅस्टिकसारखा कचरा वेगळा करून पुनर्वापर केला जाईल. जैविक कचरा बायो डायजेस्टरमध्ये टाकला जाईल. यातून मिथेन वायू तयार होईल. CO2 (कार्बन डायऑक्साइड) मिथेनपासून वेगळा केला जाईल आणि हायड्रोजन तयार होईल."

टॅग्स :नितीन गडकरीनागपूरमहसूल विभाग