Lokmat Money > बिझनेस न्यूज > तुमची ‘शाॅपिंग लिस्ट’ केवढी?; लक्झरी वस्तूंवर नजर, खिसा करणार माेकळा

तुमची ‘शाॅपिंग लिस्ट’ केवढी?; लक्झरी वस्तूंवर नजर, खिसा करणार माेकळा

यंदा आहे भली माेठ्ठी यादी, डेलाॅइटने एका सर्वेक्षणातून खरेदीबाबत लाेकांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लाेकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 08:06 AM2023-09-23T08:06:46+5:302023-09-23T08:07:04+5:30

यंदा आहे भली माेठ्ठी यादी, डेलाॅइटने एका सर्वेक्षणातून खरेदीबाबत लाेकांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लाेकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.

How long is your 'shopping list'?; Watch out for luxury goods, make your pocket | तुमची ‘शाॅपिंग लिस्ट’ केवढी?; लक्झरी वस्तूंवर नजर, खिसा करणार माेकळा

तुमची ‘शाॅपिंग लिस्ट’ केवढी?; लक्झरी वस्तूंवर नजर, खिसा करणार माेकळा

नवी दिल्ली : गणेशाेत्सवाने देशातील सणासुदीचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झाला. गणेशाेत्सवात लाेक विविध वस्तूंची जाेरदार खरेदी करताना दिसून आले. हेच चित्र पुढील काही महिन्यांमध्ये दिसणार आहे. लाेकांनी शाॅपिंग करण्यासाठी माेठी यादी तयार केली आहे. विशेष म्हणजे, निम्म्याहून अधिक लाेकांच्या यादीत लक्झरी वस्तूंची संख्या जास्त आहे. लाेकांनी खर्चाची चिंता नसून खिसा माेकळा करायला जनता तयार झाली आहे.

डेलाॅइटने एका सर्वेक्षणातून खरेदीबाबत लाेकांची ‘मन की बात’ जाणून घेतली. त्यानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लाेकांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. लाेकांचा कल लक्झरी वस्तू, परदेश सहल आणि नव्या वाहनांच्या खरेदीकडे दिसला. काही महिन्यांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तू, किरणा तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या हाेत्या, तरीही सणासुदीच्या खरेदीवर त्याचा परिणाम हाेणार नाही. 

खर्चाची चिंता नाही 
७४% लाेकांना खर्चाची काेणतीही चिंता नाही. यातून दमदार सणासुदीच्या हंगामाचे संकेत मिळतात. 
६०% लाेकांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.
५९% लाेकांना पाच वर्षांत चांगले राहणीमान हवे आहे.

लग्झरी वस्तूंकडे वळले भारतीय ग्राहक
भारतीय ग्राहक लग्झरी वस्तुंकडे वळत आहे, असे सर्वेक्षणातून दिसून आले. टिकाऊ वस्तू, प्रवास आणि आदरातिथ्यावर लाेक खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. यासाेबतच लहान आणि मध्यम बाजारपेठाांमध्येही उलाढाल वाढलेली आहे.

७५% लाेकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.

५६%लाेकांचा कल लक्झरी वस्तूंच्या खरेदीकडे आहे. 

४९% लाेकांना वाटते की, अनपेक्षित खर्च सहज हताळता येईल.

५७% लाेकांची खाण्यापिण्याच्या तसेच किरणा सामान खरेदीसाठी प्रमियम वस्तूंना पसंती आहे.

Web Title: How long is your 'shopping list'?; Watch out for luxury goods, make your pocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.