Lokmat Money > बिझनेस न्यूज > बायकोचं तोंड किती वेळ बघाल? रविवारीही कामावर या, ९० तास काम करा- CEO सुब्रमण्यन

बायकोचं तोंड किती वेळ बघाल? रविवारीही कामावर या, ९० तास काम करा- CEO सुब्रमण्यन

‘एलअँडटी’चे सीईओ सुब्रमण्यन सोशल मीडियावर झाले ट्रोल; युजर्स म्हणाले- त्यांची दया येते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 06:30 IST2025-01-10T06:29:09+5:302025-01-10T06:30:09+5:30

‘एलअँडटी’चे सीईओ सुब्रमण्यन सोशल मीडियावर झाले ट्रोल; युजर्स म्हणाले- त्यांची दया येते

How long will you look at your wife's face Come to work even on Sunday work 90 hours said L&T CEO Subramanyan | बायकोचं तोंड किती वेळ बघाल? रविवारीही कामावर या, ९० तास काम करा- CEO सुब्रमण्यन

बायकोचं तोंड किती वेळ बघाल? रविवारीही कामावर या, ९० तास काम करा- CEO सुब्रमण्यन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्यांची तोंडे किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवे; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केले आहे.  

कंपनीने कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करण्यास का सांगितले आहे, असा प्रश्न सुब्रमण्यन यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटले की, ‘मी तुम्हाला रविवारीही कामावर बोलावू शकत नाही, याचा मला खेद होतो. तुम्हाला रविवारीही काम करण्यास भाग पाडता आले असते, तर मला खूप आनंद झाला असता. कारण मी स्वत:ही रविवारी काम करतो.’ सोशल मीडियावर त्यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

सुब्रमण्यन यांनी दिले चीनचे उदाहरण

सुब्रमण्यन यांनी म्हटले की, ‘चीन लवकरच अमेरिकेला मागे टाकून पुढे जाईल, असे म्हटले जाते. कारण चीनमधील लोक आठवड्यात ९० तास काम करतात. अमेरिकी लोक मात्र केवळ ५० तासच काम करतात. चीनची कार्यसंस्कृती आपणही स्वीकारायला हवी.’

दीपिका म्हणाली, हे शॉकिंग आहे...

  • सोशल मीडियावर एकाने म्हटले की, गेल्या आर्थिक वर्षात सुब्रमण्यन यांना ४३% वाढ मिळाली, एलअँडटी कर्मचार्‍यांना सरासरी वेतनवाढ फक्त १.७४% मिळाली आहे.
  • ते असहाय्य आहेत. त्यांना अशा गोष्टी सांगाव्याच लागतात. कृपया समजून घ्या मित्रांनो, गुंतवणूकदारांचा खूप दाब आहे.
  • अभिनेत्री दीपिका पदुकोण म्हणाली, उच्चपदस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचे वक्तव्य करतात, हेच शॉकिंग आहे. 
  • सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्यांची दया येते, असे एका एक्स युजरने म्हटले आहे.
  • वर्क-लाईफ बॅलेन्सबाबत एलअँडटी सर्वांत वाईट कंपनी आहे. ते वेतनही कमी देतात.
  • कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे आलेले ९०% पेक्षा अधिक फ्रेशर्स पहिल्या ३ वर्षांत कंपनी सोडतात.
  • ५०-६० टक्के पहिल्याच वर्षी निघून जातात, असे एका युजरने म्हटले आहे.


मग संडे नव्हे, ‘सन-ड्युटी’च म्हणा

आठवड्याला ९० तास? मग संडेला ‘सन-ड्युटी’च म्हणा. ‘सुट्टी’ ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा! मेहनत आणि स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे. पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं? हा यशाचा फॉर्म्युला नाही. वर्क-लाईफ बॅलेन्स आवश्यकच आहे, अशी पोस्ट आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी एक्सवर केली आहे.

आठवड्याला कुठे, किती तास काम?

  • भारत     ४६.७
  • चीन     ४६.१
  • ब्राझील     ३९
  • अमेरिका     ३८
  • जपान     ३६.६
  • इटली     ३६.३
  • ब्रिटन     ३५.९
  • फ्रान्स     ३५.९
  • जर्मनी     ३४.२
  • कॅनडा     ३२.१

Web Title: How long will you look at your wife's face Come to work even on Sunday work 90 hours said L&T CEO Subramanyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.