Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंटरनेट नसतानाही ऑनलाइन व्यवहार; कसा कराल? जाणून घ्या ट्रिक

इंटरनेट नसतानाही ऑनलाइन व्यवहार; कसा कराल? जाणून घ्या ट्रिक

गेल्याच आठवड्यात सर्व्हर एररमुळे फेसबुकसह व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया सेवा तब्बल सहा तास बंद होत्या. त्यामुळे या सेवांचे जगभरातील अब्जावधी वापरकर्ते अस्वस्थ झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 06:30 AM2021-10-18T06:30:41+5:302021-10-18T06:30:52+5:30

गेल्याच आठवड्यात सर्व्हर एररमुळे फेसबुकसह व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया सेवा तब्बल सहा तास बंद होत्या. त्यामुळे या सेवांचे जगभरातील अब्जावधी वापरकर्ते अस्वस्थ झाले.

how to make Online transactions without internet | इंटरनेट नसतानाही ऑनलाइन व्यवहार; कसा कराल? जाणून घ्या ट्रिक

इंटरनेट नसतानाही ऑनलाइन व्यवहार; कसा कराल? जाणून घ्या ट्रिक

गेल्याच आठवड्यात सर्व्हर एररमुळे फेसबुकसह व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया सेवा तब्बल सहा तास बंद होत्या. त्यामुळे या सेवांचे जगभरातील अब्जावधी वापरकर्ते अस्वस्थ झाले. अनेकांनी तर थेट व्हॉट्सॲपचा त्याग करत पर्यायी समाजमाध्यमाचा वापर सुरू केला. तर अनेकांचे आर्थिक व्यवहार अडकून पडले. 

काय आहे सुविधा?
1. तुमच्या फोनच्या डायलपॅडवर *99# हे टाइप करून कॉल बटन दाबा
2. *99# टाइप करून कॉल केल्यानंतर ॲड नंबर हा पर्याय येतो. त्यानुसार नंबर ॲड करा. 
3. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सात पर्याय दिसतील त्यात सेंड मनी, रिक्वेस्ट मनी, चेक बॅलेन्स, माय प्रोफाइल, पेंडिंग रिक्वेस्ट, ट्रँझॅक्शन्स, यूपीआय पिन इत्यादींचा समावेश असेल. 
4. पैसे पाठविण्यासाठी डायल पॅडवरील १ नंबर दाबावा लागेल. त्यामुळे तुम्हाला केवळ तुमचा मोबाइल नंबर, यूपीआय आयडी किंवा बँक अकाऊंट नंबर आणि आयएफएस कोड यांचा वापर करून पैसे पाठवणे शक्य होईल. 
5. तुम्ही सातपैकी कोणताही पर्याय निवडला की, ज्यांच्याशी व्यवहार करणार आहात त्यांचा मोबाइल नंबर, यूपीआय किंवा बँक तपशील द्यावा लागेल. 
6. सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला जेवढी रक्कम पाठवायची आहे तिचा उल्लेख करावा लागेल. 
7. अखेरीस तुम्हाला फक्त यूपीआय पिन टाकून सेंड हा पर्याय निवडावा लागेल.

ई व्यवहारांसाठी वापरले जाणारे ॲप
गुगल पे भीम ॲप 
पेटीएम फोन पे

एनपीसीआयची सुविधा
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 
फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नसतानाही पैशांचे व्यवहार करता येण्यासंदर्भातील ही सुविधा आहे. 

यूपीआय ट्रँझॅक्शनची ही सुविधा वापरण्यास अतिशय सोपी आहे. त्यासाठी पुढील टप्प्यांचा वापर करता येतो. 

Web Title: how to make Online transactions without internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.