UPI द्वारे ऑनलाइन पद्धतीचा वापर करून पैशांची देवाणघेवाण करताना आपल्याला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी इंटरनेटचा स्पीड कमी असल्यानं किंमा इंटरनेट नीट मिळत नसल्यानं युपीआयद्वारे पैसे देण्यात समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत UPI किंवा कोणत्याही UPI अॅपद्वारे कोणतेही व्यवहार करणे जवळजवळ अशक्य होते. परंतु इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून पैसे भरू शकता. ही ट्रिक अनेकांना माहितही नसेल. तुम्ही इंटरनेटशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला फक्त तुमच्या फोनच्या डायलरवर *99# USSD कोड वापरावा लागेल.
ही *99# सेवा भारतात स्मार्टफोन न वापरणाऱ्या लोकांसह सर्व मोबाईल फोनचा वापर करणाऱ्यांसाठी सादर करण्यात आली आहे. जोपर्यंत तुम्ही UPI ecosystem चा भाग आहात आणि यासाठी तुम्ही ज्या फोनचा वापर करत आहा, त्याचा नोंदणीकृत क्रमांक तुमच्या युपीआय खात्याशी जोडलेला आहे. तुम्ही *99# या सेवेचा वापर करू शकता आणि युपीआय सेवांचा लाभ घेऊ शकता.
कसं कराल पेमेंट ?
युपीआय पेमेंट सुरू करण्यापूर्वी तुम्ही जो फोन क्रमांक युपीआयवर बँक खात्यासोबत रजिस्टर केला आहे तो असणं अनिवार्य आहे.
- तुम्ही तुमच्या फोनमधील डायलर ओपन करा आणि *99# असं टाकून कॉल बटनवर क्लिक करा.
- तुम्ही पैसे पाठवण्यासाठी अनेक पर्यांयांसह एक पॉप मेन्यू पाहाल. त्यानंतर 1 ऑप्शन क्लिक करा आणि त्यानंतर सेंडवर टॅप करा. पैसे पाठवण्याचा पर्याय निवडा.
- यानंतर पैसे ज्याला पाठवायचे आहेत त्याच्याकडून आवश्यक ती माहिती घ्या. त्यानंतर नंबर टाईप करा आणि सेंडवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत हे टाकावं लागेल.
- युपीआय खात्याशी निगडीत असलेला मोबाईल क्रमांक टाईप करा आणि सेंडवर क्लिक करा. तुम्ही योग्य क्रमांक टाकला आहे का नाही याची खात्री करून घ्या.
- पॉपअप मध्ये पैसे देण्याचं कार टाका. त्यामुळे तुम्ही पैसे का देता याची माहितीही तुमच्याकडे राहिल.