Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 08:45 AM2024-06-26T08:45:34+5:302024-06-26T08:45:45+5:30

जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील.

How many bank holidays in July Stock market will remain closed for 9 days | जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील. ४ रविवार आणि २ शनिवारसह आणखी ६ दिवस विविध सण व उत्सवाच्या सुट्टया जुलैमध्ये आल्या आहेत. देशाच्या विविध भागात सण, उत्सव वेगवेगळे असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये त्यानुसार तफावत राहील. बँकिंग क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, १७ जुलै रोजी मोहरमची सुट्टी आहे. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागात त्यादिवशी बँका बंद राहतील. सुट्ट्यांच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता येतील.

...अशा आहेत बँकांच्या सुट्टया
तारीख - निमित्त - ठिकाण

  1. ३ जुलै - बेहदीन खलम, शिलाँग
  2. ६ जुलै - एमएचआयपी डे, ऐजोल
  3. ७ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  4. ८ जुलै - कांग रथयात्रा, इंफाळ
  5. ९ जुलै - दुक्पा त्से-जी, गंगटोक
  6. १३ जुलै - दुसरा शनिवार, सर्व ठिकाणी
  7. १४ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  8. १६ जुलै - हरेला, देहरादून
  9. १७ जुलै - मोहरम, बहुतांश ठिकाणी
  10. २१ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  11. २७ जुलै - चौथा शनिवार, सर्व ठिकाणी
  12. २८ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी

शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद
दरम्यान, जुलै २०२४मध्ये शेअर बाजार ९ दिवस बंद राहील. शनिवार - - रविवारचे ८ दिवस शेअर बाजार बंद राहील. तसेच १७ जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीमुळे बाजार बंद असेल.

Web Title: How many bank holidays in July Stock market will remain closed for 9 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक