Join us  

जुलैमध्ये बँकांना सुट्ट्या किती? शेअर बाजार राहणार ९ दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 8:45 AM

जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील. ४ रविवार आणि २ शनिवारसह आणखी ६ दिवस विविध सण व उत्सवाच्या सुट्टया जुलैमध्ये आल्या आहेत. देशाच्या विविध भागात सण, उत्सव वेगवेगळे असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये त्यानुसार तफावत राहील. बँकिंग क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, १७ जुलै रोजी मोहरमची सुट्टी आहे. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागात त्यादिवशी बँका बंद राहतील. सुट्ट्यांच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता येतील.

...अशा आहेत बँकांच्या सुट्टयातारीख - निमित्त - ठिकाण

  1. ३ जुलै - बेहदीन खलम, शिलाँग
  2. ६ जुलै - एमएचआयपी डे, ऐजोल
  3. ७ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  4. ८ जुलै - कांग रथयात्रा, इंफाळ
  5. ९ जुलै - दुक्पा त्से-जी, गंगटोक
  6. १३ जुलै - दुसरा शनिवार, सर्व ठिकाणी
  7. १४ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  8. १६ जुलै - हरेला, देहरादून
  9. १७ जुलै - मोहरम, बहुतांश ठिकाणी
  10. २१ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी
  11. २७ जुलै - चौथा शनिवार, सर्व ठिकाणी
  12. २८ जुलै - रविवार, सर्व ठिकाणी

शेअर बाजार राहणार ९ दिवस बंददरम्यान, जुलै २०२४मध्ये शेअर बाजार ९ दिवस बंद राहील. शनिवार - - रविवारचे ८ दिवस शेअर बाजार बंद राहील. तसेच १७ जुलै रोजी मोहरमच्या सुट्टीमुळे बाजार बंद असेल.

टॅग्स :बँक