Lokmat Money > बिझनेस न्यूज > Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

किती दिवसांनी आयटीआर रिफंड प्रोसेस केला जातो? रिटर्न भरल्यानंतर माझ्या रिफंडचं काय झालं हे कसं जाणून घ्यायचं? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. पाहुया त्याची उत्तरं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 02:40 PM2023-07-06T14:40:50+5:302023-07-06T14:41:35+5:30

किती दिवसांनी आयटीआर रिफंड प्रोसेस केला जातो? रिटर्न भरल्यानंतर माझ्या रिफंडचं काय झालं हे कसं जाणून घ्यायचं? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. पाहुया त्याची उत्तरं

How many days refund money comes after filing Income Tax Return find out all answers of your questions cbdt income tax | Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

Income tax return: इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर, त्याचा रिफंड आपल्याला कधी मिळणार याची आपण सर्वाधिक वाट पाहत असतो. आर्थिक वर्ष 2022-23 साठी रिटर्न भरण्याचा कालावधी सुरू आहे. पण, रिटर्न मिळण्यासाठी किती दिवस वाट पाहायची? किती दिवसांनी आयटीआर रिफंड (ITR Refund) प्रोसेस केला जातो? रिटर्न भरल्यानंतर माझ्या रिफंडचं काय झालं हे कसं जाणून घ्यायचं? हे सर्व प्रश्न अनेकदा करदात्यांना पडलेले असतात. आज आपण त्या प्रश्नांची उत्तंर जाणून घेऊ. खुद्द सीबीडीटीच्या अध्यक्षांनीच यासंदर्भातील माहिती दिलीये.

ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. रिटर्नची प्रक्रिया केल्यानंतर (ITR प्रोसेसिंग) टॅक्स डिपार्टमेंट तुमचा क्लेम योग्य आहे किंवा नाही त्यानुसार तुम्हाला त्याची एसएमएस आणि ईमेलद्वारे माहिती देतो. या मेसेजमध्ये विभाग तुमच्या खात्यात परताव्याची रक्कम म्हणून किती रक्कम येईल हे सांगतो. याशिवाय तुम्हाला एक सिक्वेन्स नंबरही मिळतो. ही माहिती आयकर कायद्याच्या कलम 143 (1) (Income tax notice) अंतर्गत पाठवली जाते.

थेट बँकेत येतो रिफंड
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही रिफंडची प्रक्रिया करते. हा रिफंड थेट करदात्याच्या खात्यात जमा केला जातो किंवा त्याच्या पत्त्यावर चेक किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे पाठवला जातो. त्यामुळे आयटीआर भरताना बँकेचे तपशील अचूक दिलेले आहेत की नाही याची खात्री करावी. परताव्याची रक्कम तुम्ही दिलेल्या खात्यातच येते. बँक खात्याच्या तपशिलांमध्ये काही माहिती जुळत नसल्यास, तर रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही तुमचे तपशील देण्यापूर्वी तपासणं अधिक महत्त्वाचं आहे.

किती दिवसांत मिळतो रिफंड?
आयकर रिटर्नची ई-फायलिंग प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूप वेगवान झाली आहे. यामुळेच रिटर्न योग्य वेळी भरल्यास तुम्हाला रिफंड लवकर मिळू शकतो. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे (CBDT) अध्यक्ष नितीन गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार आयकर रिटर्नप्रमाणेच रिफंडची प्रक्रियाही आता जलद झालीआहे. मागील आर्थिक वर्षाचे रिटर्न भरल्यानंतर पहिल्या 30 दिवसांत रिफंड जारी करण्यात आले. टेक्नॉलॉजीच्या वापरानं इन्कम टॅक्स रिटर्नचं काम अतिशय जलद झालं आहे.

16 दिवसांत रिफंड
सीबीडीटीच्या चेअरमनच्या म्हणण्यानुसार, टॅक्स रिफंडसाठी लागणारा सरासरी वेळ 2022-23 या आर्थिक वर्षात 16 दिवसांवर आला आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये तो 26 दिवस होता. आयटीआर दाखल केल्यानंतर एका दिवसात प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामात चांगला वेग आला आहे. 2021-22 मध्ये हे प्रमाण 21 टक्के होते, ते 2022-23 मध्ये 42 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. आयकर विभागाने 28 जुलै 2022 रोजी एका दिवसात सर्वाधिक 22.94 लाख रिटर्नची प्रक्रिया केली होती. यंदाही असंच काहीसं घडण्याची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

ई-फायलिंग वेबसाइटवर कर रिटर्नची स्थिती तपासा
1. सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
2. पॅन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड यांसारखी माहिती टाकून तुमच्या खात्यात लॉग इन करा.
3. 'रिव्ह्यू रिटर्न्स/फॉर्म' वर क्लिक करा.
4. ड्रॉप डाउन मेनूमधून 'इन्कम टॅक्स रिटर्न' निवडा. ज्या असेसमेंट इयरसाठी तुम्हाला आयकर रिटर्नची स्थिती तपासायची आहे ते निवडा.
5. तुमचा अॅक्नॉलेजमेंट क्रमांकावर म्हणजेच हायपरलिंकवर क्लिक करा.
6. तुमच्या स्क्रीनवर रिटर्न भरण्याची टाइमलाइन दाखवणारा एक पॉप-अप दिसेल. तुमचा ITR कधी भरला आणि व्हेरिफाय केला गेला, प्रोसेसिंग आणि रिफंड इश्यू होण्याची तारीख अशी माहिती तुम्हाला दिसेल.
7. याशिवाय, ते असेसमेंट इयर, स्टेटस, नाकारल्याचं कारण आणि पेमेंटची पद्धत याची माहितीदेखील मिळेल.

TIN NSDL वेबसाइटवर माहिती कशी तपासाल?
टॅक्स रिफंडची स्थिती TIN NSDL वेबसाइटवर देखील तपासली जाऊ शकते. रिफंड पाठवल्याच्या तारखेपासून 10 दिवसांनी वेबसाइटवर त्याची स्थिती दिसून येते. तुम्ही आयकर परताव्याची स्थिती कशी तपासू शकता ते पाहू.
1. प्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जा.
2. तुमच्या पॅनची माहिती भरा.
3. ज्या असेसमेंट इयरसाठी तुम्हाला रिटर्नची स्थिती तपासायची आहे ते निवडा.
4. कॅप्चा कोड टाका आणि सबमिटवर क्लिक करा. तुमच्या रिटर्नच्या स्थितीवर आधारित तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक मेसेज दिसेल.

Web Title: How many days refund money comes after filing Income Tax Return find out all answers of your questions cbdt income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.