EPFO: अनेक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांना त्यांच्या ईपीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी केलेल्या क्लेमनंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी केलेल्या क्लेमनंतर आपल्या क्लेमची माहिती देण्यात आलेली नाही, अशी व्यथा काहींनी ईपीएफओच्या सोशल मीडिया साइटवर मांडली.
काय म्हटलं ईपीएफओनं?
ईपीएफओचे लक्ष वेधण्यासाठी काही ईपीएफ सदस्यांनी आपले प्रश्न आणि तक्रारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्या. ईपीएफओनं पैसे काढण्याच्या क्लेमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं दिली. सामान्यत: क्लेम सेटलमेंटसाठी किंवा पीएफचे पैसे मिळण्यासाठी २० दिवसांचा कालावधी लागत असल्याचं ईपीएफओनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय.
... तर इकडे करा तक्रार
जर क्लेमचं सेटलमेंट २० दिवसांमध्ये झालं नाही, तर त्यांना ईपीएफओकडे तक्रार करता येऊ शकते. ईपीएफओनं एका सदस्याला उत्तर देताना http://epfigms.gov.in या वेबसाईटवर तक्रार दाखल करता येऊ शकते असं म्हटलं. तसंच यावर तक्रार ट्रॅकही करता येऊ शकते.