नवी दिल्ली : गेल्या आर्थिक वर्षात १६.६३ लाख काेटी रुपये एवढे आयकराच्या माध्यमातून थेट कर संकलन झाले आहे. तर, चालू वित्त वर्षात आतापर्यंत १३.७० लाख काेटी रुपये एवढे शुद्ध थेट कर संकलन (नेट डायरेक्ट टॅक्सेस) झाले आहे. विशेष म्हणजे, हे कर संकलन देशातील २.२४ काेटी करदात्यांनी जमा केलेले आहे.
उर्वरित करदात्यांनी शून्य करदायित्व दाखविलेले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चाैधरी यांनी लाेकसभेत यासंदर्भात माहिती सादर केली. गेल्या पाच वर्षांमध्ये आयकर विवरण दाखल करणाऱ्यांची संख्या सुमारे २० टक्क्यांनी वाढली आहे.
यावर्षी काय?
१३.७० लाख काेटी रुपये शुद्ध करसंकलन यावर्षी १७ डिसेंबरपर्यंत झाले आहे.
६.९५ लाख कोटी रुपये कॉर्पोरेट कर
६.७३ लाख कोटी रुपये व्यक्तिगत आयकराद्वारे मिळाले.
१८.२३ लाख कोटी रुपयांचे कर संकलन चालू वित्त वर्षात होण्याची शक्यता आहे.
७.४०काेटी
लाेकांनी आयकर विवरण दाखल केले.
५.१६काेटी
लाेकांनी शून्य करदायित्व दाखविले.
२.९०काेटी
लाेकांनी २०१९-२० या आर्थिक वर्षात शून्य करदायित्व दाखविले हाेते.
२.२४काेटी
लाेकांकडून १६.६३ लाख काेटी रुपये आयकर गाेळा करण्यात आला.
११.३८
लाख काेटी रुपये थेट कर संकलन २०१८-१९ या आर्थिक वर्षात झाले हाेते.
६८% वाढ कर संकलनात गेल्या पाच वर्षात झाली.