दररोजच्या घरच्या जेवणापेक्षा महिन्यातून एखाद्यावेळी किंवा कुणाची पार्टी असल्यास आपण सहजपणे हॉटेल वा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो. हॉटेलमधील जेवणाची थाळी ही शहर, ग्राहकांची खरेदी क्षमता, हॉटेलचा दर्जा आदींवरून ठरते, तरीही भारतात कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यास सरासरी १५० ते २०० रुपयांना थाळी मिळते. इतर देशांमध्ये ती किती रुपयांना मिळते, त्यावर एक नजर...
किमान दर कुठे?
देश दर
स्वित्झर्लंड $२८.९६
डेन्मार्क $२१.१०
लक्झेमबर्ग $२०.२३
अमेरिका $२०.००
नॉर्वे $१९.९०
इंग्लंड $१९.६४
इस्रायल $१९.४१
आइसलॅण्ड $१९.११
बेल्जियम $१७.९८
ऑस्ट्रेलिया $१७.१०
सर्वात स्वस्त कुठे?
देश दर
पाकिस्तान $१.४६
इंडोनेशिया $१.६७
बांगलादेश $१.८४
नेपाळ $१.९०
व्हिएतनाम $२.१२
अल्गेरिया $२.२३
श्रीलंका $२.२६
थायलंड $२.३०
भारत $२.४३
ट्युनिशिया $२.६३
दक्षिण आशियात स्वस्तात जेवण
जगातील अनेक देशांमध्ये मिळणाऱ्या जेवणाची थाळीच्या किमती पाहता दक्षिण आशियात स्वस्तात जेवण मिळत असल्याचे दिसते. दक्षिण आशियातील भारत, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये सरासरी १५० ते २०० रुपयांना जेवणाची थाळी मिळत असल्याचे आकडेवारीवरून समजते.
उत्तम आरोग्यासाठी आहारात हंगामी फळांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. शक्यतो ज्युस न पिता फळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात.