Lokmat Money > बिझनेस न्यूज > Payment Card चे किती प्रकार? जाणून घ्या, या संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आणि फायदे ...

Payment Card चे किती प्रकार? जाणून घ्या, या संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आणि फायदे ...

payment cards : मुख्यत: चार प्रकारची पेमेंट कार्ड (payment card) असतात. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कार्ड.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 06:04 PM2021-07-25T18:04:43+5:302021-07-25T18:12:03+5:30

payment cards : मुख्यत: चार प्रकारची पेमेंट कार्ड (payment card) असतात. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कार्ड.

how many types of payment cards are there know all the important things related to them and their benefits | Payment Card चे किती प्रकार? जाणून घ्या, या संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आणि फायदे ...

Payment Card चे किती प्रकार? जाणून घ्या, या संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आणि फायदे ...

मुंबई : मार्केटमध्ये पेमेंट कार्डचे अनेक प्रकार आहेत. या बद्दल ग्राहक अनेकदा संभ्रमात असतात. आम्ही आपल्याला या कार्ड्सबद्दल सविस्तर माहिती देत आहोत. मुख्यत: चार प्रकारची पेमेंट कार्ड (payment card) असतात. यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, प्रीपेड कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक कार्ड. (how many types of payment cards are there know all the important things related to them and their benefits)

या कार्डचे फायदे, उपयोग आणि विविध आधारे त्यांचा वेगवेगळे समजले जाते. पेमेंटच्या बाबतीत ही सर्व कार्ड वेगळ्या प्रकारे वापरली जातात. काही थेट कार्डधारकाच्या बचत बँक खात्याशी जोडलेले आहेत, तर काही तुमची क्रेडिट स्कोअर सुधारण्यात मदत करू शकतात.

डेबिट कार्ड (Debit Card)
तुमच्याकडे बचत बँक खाते असल्यास, बँकेने तुम्हाला डेबिट कार्ड इश्यू केलेच असेल. हे कार्ड आपल्या बचत खात्याशी लिंक्ड असते. डेबिट कार्ड सामान्यत: व्हिसा किंवा मास्टर कार्ड सारख्या क्रेडिट नेटवर्कशी संबंधित असतात. कार्ड्सवर या क्रेडिट नेटवर्कच्या प्रिंट आहेत म्हणजे त्या कार्डमधून विविध देशांमध्ये आणि ठिकाणी पेमेंट करता येऊ शकतात. मात्र, डेबिट कार्ड वापरल्याने आपली क्रेडिट स्कोअर मजबूत होत नाही. तुम्ही आपले डेबिट कार्ड वापरुन एटीएममधून पैसे काढू शकता.
         
क्रेडिट कार्ड (Credit Card)
बर्‍याच बँका आणि नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) क्रेडिट कार्ड जारी करतात. इतर अधिकृत कंपन्या देखील क्रेडिट कार्ड जारी करू शकतात. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कार्डधारक पीओएस टर्मिनल किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरील वस्तू किंवा सेवांसाठी पैसे देऊ शकतात. तुम्ही वेळेवर बिले भरल्यास क्रेडिट कार्ड तुमचे क्रेडिट स्कोअर मजबूत करण्यास मदत करते. क्रेडिट कार्ड परदेशातही वापरली जाऊ शकतात. एटीएममधून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जाऊ शकतो, परंतु पैसे काढण्याच्या रकमेनुसार शुल्क वजा केले जाते.

प्रीपेड कार्ड (Prepaid Card)
बर्‍याच बँका आणि कंपन्या प्रीपेड कार्ड जारी करतात. कार्डधारकाकडून आगाऊ भरलेल्या रकमेविरूद्ध प्रीपेड कार्ड दिले जाते. ही रक्कम प्रीपेड कार्डमध्ये ठेवली जाते. हे कार्ड पाकीट म्हणून वापरले जाऊ शकते. प्रीपेड कार्डचे नियम कार्ड जारीकर्त्यावर अवलंबून असतात. या कार्डाचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि पॉस टर्मिनल / ई-कॉमर्सवर खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्ही या कार्डमधून फंड ट्रांसफर देखील करू शकता, परंतु ते दिलेली मर्यादा आणि अटींवर अवलंबून आहे.

इलेक्ट्रॉनिक कार्ड (Elctronic Cards)
हे कार्ड वैयक्तिक कर्जासारख्या विशेष ओव्हरड्राफ्ट खात्यात दिले जाते. हे डेबिट कार्डसारखेच आहे. ओव्हरड्राफ्ट खात्यांसह बँक ग्राहकांना घरगुती डिजिटल व्यवहारासाठी इलेक्ट्रॉनिक कार्ड प्रदान करावे लागतात. सिक्युरिटी, मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आणि एएफए (AFA) यासारख्या सर्व हेतूंसाठी डेबिट कार्डसंदर्भातील सूचना फक्त इलेक्ट्रॉनिक कार्डांवर लागू आहेत.

Web Title: how many types of payment cards are there know all the important things related to them and their benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.