Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतीयांना किती मिळतो पगार? १०४ देशांच्या यादीत भारत ६५व्या स्थानावर

भारतीयांना किती मिळतो पगार? १०४ देशांच्या यादीत भारत ६५व्या स्थानावर

‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जारी केलेल्या १०४ देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक सर्वांत शेवटी १०४वा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:44 AM2023-05-03T07:44:39+5:302023-05-03T07:45:04+5:30

‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जारी केलेल्या १०४ देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक सर्वांत शेवटी १०४वा लागला आहे.

How much do Indians get Salary? India ranks 65th in the list of 104 countries | भारतीयांना किती मिळतो पगार? १०४ देशांच्या यादीत भारत ६५व्या स्थानावर

भारतीयांना किती मिळतो पगार? १०४ देशांच्या यादीत भारत ६५व्या स्थानावर

नवी दिल्ली - कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वेतन देणाऱ्या देशांत स्वित्झर्लंड जगात पहिल्या स्थानी असून, सर्वात कमी वेतन देणारा देश म्हणून पाकिस्तानचा क्रमांक आहे. १०४ देशांच्या यादीत भारताचा ६५वा क्रमांक आहे. स्वित्झर्लंडमध्ये मासिक वेतन ६,०९६ डॉलर (सुमारे ४,९८,६५२ रुपये) आहे. 

‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने जारी केलेल्या १०४ देशांच्या यादीत पाकिस्तानचा क्रमांक सर्वांत शेवटी १०४वा लागला आहे. पाकिस्तानातील सरासरी मासिक वेतन फक्त १४५ डॉलर (सुमारे ११,८६१ रुपये) आहे. ५,०१५ डॉलरसह (४,१०,२२७ रुपये) लग्झमबर्ग दुसऱ्या स्थानी, तर ४,९८९ डॉलरसह (४,०८,१०० रुपये) सिंगापूर तिसऱ्या स्थानी आहे. 

शेवटच्या १० देशांत पाकसह बांग्लादेशाचाही समावेश झाला आहे. बांगलादेशातील सरासरी मासिक वेतन २०,८५९ रुपये आहे. व्हेनेझुएला, नायजेरिया, इजिप्त यांचाही या यादीत समावेश आहे.  तुर्कस्तान, ब्राझिल, अर्जेंटिना, इंडोनेशिया आणि कोलंबिया हे भारताच्या खाली आहेत. 

बेरोजगारी पुन्हा वाढली
‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकाॅनॉमी’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये वाढून ८.११ टक्के झाला आहे. हा बेरोजगारीचा चार महिन्यांचा उच्चांक ठरला आहे. बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ७.८० टक्के, तर फेब्रुवारीमध्ये ७.४५ टक्के होता. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात परिस्थिती वाईट आहे. 
महिना बेरोजगारी दर 
जानेवारी     ७.१४% 
फेब्रुवारी     ७.४५% 
मार्च     ७.८०% 
एप्रिल     ८.११%

किती नोकऱ्या जाणार?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार, पुढील ५ वर्षांत जगभरात ८ कोटी ३० लाख नोकऱ्या नष्ट होतील आणि ७ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होतील. २०२७ पर्यंत आजच्या तुलनेत १.४० कोटी नोकऱ्या कमी होतील.

भारतातील सरासरी वेतन ४६,८७१ रुपये
६५व्या स्थानावर असलेल्या भारतातील सरासरी वेतन ५७३ डॉलर (४६,८७१ रुपये) आहे. रशिया, मेक्सिको, चीन, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, डेन्मार्क आणि कतार या देशांत भारतापेक्षा अधिक वेतन मिळते. 

Web Title: How much do Indians get Salary? India ranks 65th in the list of 104 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत