नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगरभाजप शासित राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. केंद्राने सहा महिन्यांपूर्वीच सर्व राज्यांना इंधनाच्या दरांवरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काही राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. कोणत्या राज्यात इंधनावर किती व्हॅट लागतो, पाहू या...
पेट्रोलवरील करवसुली
(भाजपशासित राज्ये)
हिमाचल प्रदेश : १६.६० रु.
उत्तराखंड : १४.५१ रु.
उत्तर प्रदेश : १६.५० रु.
आसाम : १७.३८ रु.
गुजरात : १६.५६ रु.
(बिगरभाजप शासित राज्ये)
महाराष्ट्र : ३२.१५ रु.
केरळ : २७.२४ रु.
आंध्र प्रदेश : ३१.५९ रु.
पश्चिम बंगाल : २६.२४ रु.
राजस्थान : २९.१० रु.
आंध्र प्रदेशात सर्वाधिक व्हॅटवसुली
राज्य पेट्रोल डिझेल
महाराष्ट्र २६% २४%
उत्तर प्रदेश १९.३६% १७.०८%
दिल्ली १९.४०% १६.७५%
राजस्थान ३१.०४% १९.३०%
आंध्र प्रदेश ३१.००% २२.२५%
पेट्रोल १०० रुपये लिटर असे गृहीत धरल्यास कोणत्या राज्यात किती कर आकारणी
महाराष्ट्र : ₹ ५२.५०
आंध्र प्रदेश : ₹ ५२.०४
मध्य प्रदेश : ₹ ५०.०६
केरळ : ₹ ५०.०२
राजस्थान : ₹ ५०.०८
छत्तीसगड : ₹ ४८.०३
कर्नाटक : ₹ ४८.०१
पश्चिम बंगाल : ₹ ४८.०७
पंजाब : ₹ ४४.०६
बिहार : ₹ ५०.००
झारखंड : ₹ ४७.००
जम्मू-काश्मीर : ₹ ४५.०९
उत्तर प्रदेश : ₹ ४५.०२
गुजरात : ₹ ४४.०५
पेट्रोल-डिझेलच्या किमती
मुंबई : ₹१२०.५१ आणि ₹१०४.७७
नवी दिल्ली : ₹१०५.४१ आणि ₹९६.६७
कोलकाता : ₹११५.१२ आणि ₹९९.८३
अहमदाबाद : ₹१०५.०८ आणि ₹९९.४३
पाटणा : ₹११६.३० आणि ₹१०१.०६