लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफ) सहा कोटी सदस्यांना त्यांच्या ठेवीवर वित्त वर्ष २०२३-२४ साठी दिल्या जाणाऱ्या व्याजदराचा निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे.
सीबीटीची ही २३५ वी बैठक आहे. बैठकीसाठी विश्वस्त मंडळाच्या सर्व सदस्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत. यावेळी व्याजदरात वाढ केली जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारण वर्षभर महागाई व व्याजदर उच्च पातळीवरच होते तसेच ईपीएफओकडे गेल्या वर्षी चांगली शिल्लक होती. वित्त वर्ष २०२२-२३ साठी ईपीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याजदर निश्चित केला होता.