Join us  

तुमचा पीएफ किती?; अशी जाणून घ्या खात्यातील रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 10:56 AM

ई-नाॅमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. ही प्रक्रिया जाणून घेऊ या.

भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने नुकतीच व्याजदर वाढीची घाेषणा केली आहे. नोकरदारांच्या या फंडात जमा असलेल्या निधीवर मिळणारी व्याजाची रक्कम वाढणार आहे. या खात्यात दरमहा ठरावीक रक्कम नियोक्ता आणि कर्मचारी या दोघांकडून जमा केली जाते. या निधीत किती रक्कम आहे, हे सहजपणे जाणून घेता येते. त्यापूर्वी ई-नाॅमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. ही प्रक्रिया जाणून घेऊ या.

एसएमएसचा पर्याय

तुम्हाला EPFO कडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरून 7738299899 वर EPFOHO UAN लिहून मेसेज पाठवावा लागेल. यात युएएनच्या ठिकाणी युएएन नंबर लिहावा. एसएमएस पाठविल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या खात्याशी संबंधित ईपीएफ बॅलन्ससह इतर माहिती मिळेल.

मिस्ड कॉलद्वारेही माहिती

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून फक्त 9966044425 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. रिंग वाजल्यानंतर फोन आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि काही वेळाने तुम्हाला ईपीएफ शिल्लक आणि तुमच्या खात्याशी संबंधित इतर माहिती एसएमएसच्या रूपात मिळेल.

ऑनलाईन कसा चेक कराल?

  • तुम्ही ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन करून तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. मात्र, यासाठी तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणे आवश्यक आहे.
  • युएएन जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम EPFO च्या MEMBER e-SEWA वेबसाइटवर जा. येथे तुम्हाला वेबसाइटच्या तळाशी तुमचा UAN नंबर जाणून घ्या, हा पर्याय दिसेल. 
  • जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहीत असेल, तर तुम्ही थेट त्याच्या वर दिलेल्या Activate UAN या पर्यायावर क्लिक करू शकता.
  • खात्यात जमा असलेली रक्कम तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलला भेट द्या आणि UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • आपले सध्याचे ईपीएफ खाते निवडा आणि पासबुक ओपन करा. त्यात तुम्हाला शिल्लक रक्कम पाहता येईल.