अवघ्या काही वर्षांत आपल्या कंपनीला कुठल्या कुठे नेऊन पोहोचविणारे दोन म्होरके : एक इलॉन मस्क आणि दुसरे ॲमेझॉनचे जेफ बेझोस. या कंपनीचा वार्षिक महसूल आहे तब्बल ४७० बिलियन अमेरिकन डॉलर्स! साधी पुस्तके विकण्यासाठी म्हणून एका गॅरेजमधून सुरू झालेली ही कंपनी आज जगभरातल्या लोकांच्या आयुष्याशी जोडली गेलेली आहे. ॲमेझॉनचा हा अवाढव्य वार्षिक महसूल नेमका कशाकशातून मिळतो, याचा हा तपशील..
ॲमेझॉनच्या २०२१ या वर्षातल्या महसुलाची विभागणी
ऑनलाइन स्टोअर २२२ बिलियन डॉलर्स ऑनलाइन विक्री, डिजिटल मीडिया
विक्री व्यवहारातून मिळणारे कमिशन आणि शिपिंग शुल्क १०३.३ बिलियन डॉलर्स
ऑन डिमांड क्लाउड कम्प्युटिंग ६२.२ बिलियन डॉलर्स
ओटीटी मनोरंजन वाहिनीच्या सदस्य शुल्कापोटी मिळणारी रक्कम ३१.७ बिलियन डॉलर्स
जाहिराती वेबसाइटवर केल्या जाणाऱ्या जाहिरातींचे शुल्क - ३१.१ बिलियन डॉलर्स
दुकानातून होणाऱ्या थेट विक्रीचा महसूल १७.० बिलियन डॉलर्स
इतर २.१ बिलियन डॉलर्स ०.५%
एकूण वार्षिक महसूल ४६९.८ बिलियन डॉलर्स
संदर्भ : ॲमेझॉनचा वार्षिक अहवाल आणि फिनशॉट्स.