कोरोनाचे दृष्टचक्र संपण्याच्या मार्गावर असून त्यामुळे उद्योग क्षेत्रही तेजीच्या लाटेवर स्वार होण्याची शक्यता आहे. बाजारात मागणी वाढू लागली आहे. उद्योग आणि व्यापार पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले आहेत. त्यामुले आता यंदा नोकरदारांना चांगली पगारवाढ मिळू शकेल, असा अंदाज आहे. पाहूया यंदा किती वाढ अपेक्षित केली जात आहे.
२०१६ नंतर किती वाढले सरासरी वेतन?
२०१६ १०.२ टक्के२०१७ ९.३ टक्के२०१८ ९.५ टक्के२०१९ ९.३ टक्के२०२० ६.१ टक्के२०२१ ९.३ टक्के२०२२ ९.९ टक्के
कोणते क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची सर्वांधिक चांदी
ई-कॉमर्स - १२.४%आयटी - ११.६%सेवा - १०.९% आयटी सेवा - १०.७% खाणकाम- ८.३% रेस्टॉरंट - ८.५% सीमेंट - ८.६%
वेतन वाढू शकते कारण?
१. कंपन्यांची वित्तीय स्थिती सुधारू लागली आहे.२. कंपन्यांची उलाढाल वाढली आहे.३. बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी वाढवण्यावर भर४. कोरोना काळात नोकऱ्या सोडणारेही अधिक होते, त्यातून उरलेले कुशल मनुष्यबळ टिकवण्यासाठी धडपड.