Lokmat Money > बिझनेस न्यूज > ८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; फॉर्म्युला वाचा

८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; फॉर्म्युला वाचा

देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:49 IST2025-01-16T15:48:50+5:302025-01-16T15:49:21+5:30

देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती.

How much salary will government employees get due to the 8th Pay Commission?; Read the formula | ८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; फॉर्म्युला वाचा

८ व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार?; फॉर्म्युला वाचा

नवी दिल्ली - केंद्र सरकारने १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना ८ वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी दिली आहे. वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांकडून सातत्याने पगारवाढीची मागणी केली जात होती. सध्या ७ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार दिला जातो. दर दहा वर्षांनी सरकार वेतन आयोग लागू करते. ७ व्या वेतन आयोगाला जानेवारी २०२६ मध्ये १० वर्ष पूर्ण होतील त्यामुळे ८ वा वेतन आयोग लवकर लागू करावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत होती. अखेर आज केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली आहे.

देशात ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ साली लागू झाला होता. त्याचा सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ झाली होती. आता ८ व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार १८ हजारावरून ३४५०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. महागाई भत्त्यातील वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर करण्यात येत होती परंतु ८ व्या वेतन आयोगात त्यात बदल होईल. याशिवाय कमाल पगार ४.८ लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. कर्मचाऱ्यांसह निवृत्तीधारकांनाही किमान १७२०० रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनधारकांच्या वेतनात २.८८ टक्के वाढ होऊ शकते. 

७ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी २०१६ मध्ये झाली होती आणि त्यानुसार सरकारी कर्मचार्‍यांचे पगार २.५४ पट वाढवण्यात आले होते. ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार कर्मचार्‍यांचे पगार २.८६ गुणांकाने वाढण्याची शक्यता आहे. तसेच नवीन पगार १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात. या आयोगामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतन संरचनेत मोठे बदल होतील. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार सात टियर १ ते टियर १३ या श्रेणींमध्ये दिला जातो. 

किमान पगार - १८ हजार रुपये (Pay Level 1) - हा पगार मुख्यत: सफाई कामगार, लिपिक, सहाय्यक इत्यादी पदांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. 

कमाल पगार - २ लाख ५० हजार (Pay Level 18) - हा पगार सचिव, प्रधान सचिव आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिला जातो. 

पगाराशिवाय दिले जातात भत्ते

केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यामध्ये मुख्य भत्ते खालीलप्रमाणे आहेत

महागाई भत्ता (Dearness Allowance - DA): महागाईच्या दरानुसार भत्ता वाढवला जातो.
घर भत्ता (House Rent Allowance - HRA): कर्मचाऱ्याच्या राहत असलेल्या घराच्या भाड्याच्या आधारावर भत्ता दिला जातो.
वाहन भत्ता (Transport Allowance): ऑफिसला जाण्यासाठी वाहन वापरणाऱ्या कर्मचार्‍यांना भत्ता दिला जातो.
 

Web Title: How much salary will government employees get due to the 8th Pay Commission?; Read the formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.