Lokmat Money > बिझनेस न्यूज > रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

C-295 Aircraft Specialty : लवकरच भारतीय लष्कराची ताकद कैक पटीने वाढणार आहे. कारण, टाटा आणि स्पेने कंपनीच्या सहकार्यतून मेड इन इंडिया लष्करी एअरक्राफ्टची निर्मिती केली जाणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:50 PM2024-10-28T15:50:32+5:302024-10-28T15:53:21+5:30

C-295 Aircraft Specialty : लवकरच भारतीय लष्कराची ताकद कैक पटीने वाढणार आहे. कारण, टाटा आणि स्पेने कंपनीच्या सहकार्यतून मेड इन इंडिया लष्करी एअरक्राफ्टची निर्मिती केली जाणार आहे.

how much special 9s c 295 aircraft built in tata and airbus facility | रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

रतन टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट भारताला देणार नवी ताकद; चीन-पाकिस्तानची वाकडी नजर होईल सरळ

C-295 Aircraft Specialty : गेल्या काही वर्षात भारताने अनेक क्षेत्रात स्वदेशी संकल्पना सत्यात उतरवण्यात यश मिळवलं आहे. या यादीत आता आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. भारतीय विमान उद्योगाने सोमवारी आणखी एक टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी गुजरातमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) चे उद्घाटन केले. या कारखान्यात C-295 विमानांची निर्मिती केली जाईल. भारतीय भूमीवर तयार होणारे हे पहिले स्वदेशी विमान असेल. टाटा आणि फ्रेंच कंपनी एअरबस संयुक्तपणे याची निर्मिती करणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रोजक्ट देशाच्या विमान उद्योगासाठी मैलाचा दगड असल्याचे म्हटले.

वास्तविक, संरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये एअरबस डिफेन्स आणि स्पेस एसए, स्पेनसोबत २१,९३५ कोटी रुपयांचा करार केला होता. या अंतर्गत भारताला ५६ सी-२९५ वाहतूक विमानांचा पुरवठा केला जाणार आहे. या विमानाद्वारे भारतीय हवाई दलाचे Avro-748 विमान रिप्‍लेस केले जाणार आहे. करारानुसार, स्पेनमधून १६ विमाने पूर्णपणे असेंबल करून पाठवायची होती, तर ४० विमाने येथे असेंबल केली जाणार आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत वडोदरा प्लांटमधून पहिले विमान तयार होईल, असा विश्वास आहे.

विमानातील बहुतांश भाग स्वदेशी
एअरो इंजिन वगळता या विमानातील बहुतांश भाग भारतात बनवले जाणार आहेत. विमानात सुमारे १४ हजार पार्ट्स बसवलेले आहेत, त्यापैकी १३,००० पार्ट भारतात बनवले जातात. साहजिकच हे विमान मेड इन इंडियन दिसते. टाटा आणि एअरबसच्या सहकार्यातून वडोदरा येथील प्लांटमध्ये याची निर्मिती केली जाणार आहे.

C-२९५ विमानाची क्षमता किती आहे?
प्रतिकूल परिस्थितीत देखील उड्डाण करण्याची क्षमता या विमानाची आहे. ५ ते १० टन क्षमतेच्या या वाहतूक विमानात लष्करी तुकड्या वाहून नेण्याची क्षमता असून ते मालवाहतूकही करू शकते. या संयुक्त उपक्रमामुळे भारतीय एरोस्पेसमध्ये नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत. एअरबस देखील आपले उत्पादन भारतात हलवत आहे. टाटा-एअरबस सुविधेमुळे ६०० प्रत्यक्ष नोकऱ्या आणि ३,००० अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील.

Web Title: how much special 9s c 295 aircraft built in tata and airbus facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.