Join us

२००० रुपयांच्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात बँक देते 'इतके' रुपये? अशी बदला तुमची फाटलेली नोट...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:09 PM

2000 rs damaged notes how and where you can exchange : फाटलेल्या नोटा कोठे व कसे बदलू शकता आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला किती पैसे देते, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

ठळक मुद्देफाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही.

नवी दिल्ली : फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (नोट रिफंड) नियम २००९ मध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नियमांनुसार, नोटांच्या स्थितीनुसार आरबीआय कार्यालये आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये लोक फाटलेल्या नोटा बदलू शकतात. जर तुमच्याकडे फाटलेली नोट असेल तर काळजी करू नका. कारण, या फाटलेल्या नोटा कोठे व कसे बदलू शकता आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला किती पैसे देते, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

'या' ठिकाणी बदला फाटलेल्या नोटा...तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही नियुक्त बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. परंतु ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी तुमची फाटलेली नोट बदलण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना नोटा बदलण्याची सूचना केली आहे. तसेच, बँकांना त्यांच्या शाखांमध्ये नोटा बदलण्याच्या सुविधेसंबंधी फलक लावण्याची गरज आहे.

२००० रुपयांच्या फाटलेल्या नोटच्या बदल्यात इतके रुपये मिळतील... आरबीआयच्या नियमांनुसार, नोट किती फाटली हे तिच्या स्थितीवर अवलंबून असते. आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, २००० रुपयांची फाटलेली नोट ८८ चौरस सेंटीमीटर असेल तर पूर्ण पैसे मिळतील आणि ४४ चौरस सेंटीमीटर असेल तर निम्मे पैसे मिळतील.

बँक कोणतेही शुल्क आकारत नाहीफाटलेल्या नोटा बदलण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेत नाही. ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते. मात्र, अशा नोटा बदलून देण्यास बँक नकार देऊ शकते, ज्या अत्यंत खराब किंवा जळालेल्या आहेत. तसेच, जर नोट जाणीवपूर्वक कापली असेल तर ती सुद्धा बदलली जात नाही.

किती मिळेल रिफंड?५० रुपये, १०० रुपये आणि ५०० रुपयांच्या जुन्या फाटलेल्या नोटच्या पूर्ण परताव्यासाठी तुमची नोट दोन भागांमध्ये विभागली जाणे आवश्यक आहे, त्यातील एक भाग संपूर्ण नोटच्या ४० टक्के किंवा त्याहून अधिक भागांना व्यापेल असा पाहिजे. 

टॅग्स :व्यवसायबँकभारतीय रिझर्व्ह बँकपैसा