Lokmat Money > बिझनेस न्यूज > आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

Narayana Murthy :

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 02:16 PM2023-10-30T14:16:40+5:302023-10-30T14:17:32+5:30

Narayana Murthy :

How much work does Narayana Murthy himself, who advises working 70 hours a week? Read.. | आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

देशाची प्रगती व्हावी, असं वाटत असेल तर तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक नारायण मूर्ती यांनी दिला होता. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, तरुणांना आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती हे स्वत: किती तास काम कारतात याची माहित समोर आली आहे. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सुधा मूर्ती यांनी सांगितले की, नारायण मूर्ती हे आठवड्याला ८० ते ९० तास काम करतात. त्यापेक्षा कमी काम ते करत नाहीत. ते खऱ्या मेहतनीवर विश्वास ठेवतात. तसेच ते त्याच पद्धतीने जीवन जगत आले आहेत. 

मात्र नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या सल्ल्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नारायण मूर्तींचं जीवन जगून झालंय. आता ते तरुणांचं जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, इथपर्यंतची टीका काही जणांनी केली आहे. अनेक जणांनी त्यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे.

गेल्या दोन-तीन दशकांत आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करणाऱ्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी भारताला आपली कार्यसंस्कृती बदलावी लागेल. यासाठी तरुणांनी कामात जास्त वेळ घालवला पाहिजे. भारताची काम उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. हे वाढवण्यासाठी देशातील तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम करावे, असा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिला होता. 

Web Title: How much work does Narayana Murthy himself, who advises working 70 hours a week? Read..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.