Lokmat Money > बिझनेस न्यूज > कशी आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना?

कशी आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना?

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसंदर्भात (ढटरइ) सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे, क्लेम कसा मिळेल आदी

By admin | Published: September 3, 2015 09:58 PM2015-09-03T21:58:52+5:302015-09-03T21:58:52+5:30

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसंदर्भात (ढटरइ) सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे, क्लेम कसा मिळेल आदी

How is the Prime Minister's Security Insurance Plan? | कशी आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना?

कशी आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना?

यावर्षी जाहीर झालेल्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसंदर्भात (ढटरइ) सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचे स्वरुप काय, त्याचे फायदे, क्लेम कसा मिळेल आदी अनेक प्रश्न याबाबत विचारले जात आहेत. त्याची नेमकी उत्तरे वित्त मंत्रालयाने दिली असून वाचकांच्या माहितीसाठी आम्ही ती येथे देत आहोत.

प्र. १. या योजनेचे स्वरूप कसे आहे?
या योजनेत वर्षभरासाठी वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण राहील त्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.
प्र. २. या योजनेत कसा फायदा मिळेल आणि याचे विमा प्रिमियम कसे राहील?
या योजनेचा विमा प्रिमियम हा दर वर्षाला रुपये १२ रु. प्रत्येक वर्गणी दराने द्यावयाचा आहे.
प्र. ३. प्रिमियम कसे देता येईल?
प्रत्येक वर्षात जोपर्यंत योजना चालू आहे तोपर्यंत खातेधारकाच्या बचत खात्यातून परस्पर रुपये काढण्याच्या निर्देशानुसार एकदाच जसे योजनेत सहभागी होताना पर्याय निवडला असेल तसा घेण्यात येईल. योजना कार्यान्वित राहीपर्यंत वर्गणीदाराला प्रत्येक वर्षी खात्यातून रुपये काढण्यासाठी एकदाच संमती द्यावी लागेल. या योजनेचा आढावा सरकार दरवर्षी घेत राहील. त्यानुसार पुढील नियम बदलू शकतात.
प्र. ४. ही योजना कोण देऊ शकतो. त्याची अंमलबजावणी कोण करेल?
ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा निगम छकउ किंवा इतर विमा कंपन्यांद्वारा राबविली (ढरॠकउ२) जाईल. सहभागी बँका या त्यांच्या ग्राहकांसाठी अशी योजना राबविण्यासाठी कोणत्याही विमा कंपनीला यात सहभागी करू शकतात.
प्र. ५. या योजनेत कुणाला सहभागी होता येईल?
वर्षे १८ ते ७० या वयोगटातील सहभागी बँकांतील सर्व बचत खातेधारक या योजनेसाठी पात्र राहतील. एकाच वेळी अनेक बँकांत खाते असणाऱ्या ग्राहकाला फक्त एकच बचत खात्यामार्फत या योजनेत सहभागी होता येईल.
प्र. ६. योजनेत सहभागी होण्याचा कालावधी कोणता आणि त्यातील बदल कसे आहेत?
या योजनेत विमा संरक्षण हे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळासाठी एक वर्षासाठी असून दरवर्षी ३१ मे पर्यंत प्रिमियम भरता येईल. त्याची वाढीव मुदत ३१ आॅगस्ट २०१५ ही पहिल्या वर्षीसाठीच राहील. यानंतर सहभागी होणाऱ्या वर्गणीदारांना पूर्ण वार्षिक प्रिमियम द्यावे लागेल आणि स्वत: दिलेला स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
ज्यांना पुढील वर्षी योजनेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी प्रिमियम परस्पर खात्यातून वजा करण्याचे निर्देश दरवर्षी ३१ मे पूर्वी द्यावे. यानंतर सहभागी होणाऱ्या वर्गणीदारांना पूर्ण वार्षिक प्रिमियम द्यावे लागेल आणि स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल. पात्र नवीन सदस्य आणि ज्यांनी अगोदर सहभाग घेतला नाही ते पुढील वर्षात भविष्यात कधीही योजना चालू राहिली तर सदस्य बनू शकतात.
प्र. ७. प्रथम वर्षी सहभागी होऊ न शकणारा पात्र ग्राहक पुढील वर्षी या योजनेत सहभागी होऊ शकतो काय?
हो, परस्पर पैसे काढण्याच्या सेवेनुसार नवीन पात्र सदस्य या योजनेत सहभागी होऊ शकतात. त्यांनी प्रिमियम परस्पर खात्यातून वजा करण्याचे निर्देश देऊन सहभागी होता येईल. स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
प्र. ८. योजना सोडून जाणारा व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकतो काय?
कोणत्याही क्षणी सोडून जाणारा व्यक्ती परत योजनेत सहभागी होऊ शकतो, वार्षिक प्रिमियम देऊन तो योजनेत प्रवेश करू शकतो. त्यासाठी त्याला स्वत: दिलेले स्वत:चे निरोगी असल्याचा दाखला द्यावा लागेल.
प्र. ९. या योजनेत मास्टर पॉलिसी धारक कोण असेल?
सहभागी बँक ही सहभागी ग्राहकाच्या वतीने मास्टर पॉलिसी धारक असेल. या बँकेने आणि विमा संरक्षण देणारी जीवन विमा कंपनी छकउ यांनी साधी सोपी आणि ग्राहक हितदक्ष अस्थापना आणि क्लेम देणारी यंत्रणा उभारावी.
प्र. १०. या योजनेतील सहभागी ग्राहकांवरील जीवन संरक्षण केव्हा संपुष्टात येते?
सदस्याचे जीवन संरक्षण हे खालील बाबतीत संपते :
१) जन्म तारखेनुसार वय वर्ष ७० झाल्यावर (जी जवळची जन्मतारीख असेल.)
२) बचत खात्यात अपेक्षित शिल्लक नाही म्हणून आणि जीवन विमा प्रिमियम भरण्याच्या असमर्थतेत.
३) जर सदस्य हा एकापेक्षा जास्त बचत खात्यामार्फत या योजनेत संरक्षित असेल तर, अशा वेळी जीवन विमा कंपनीला असे अनेक प्रिमियम प्राप्त झाले तर फक्त २ लाख रुपयाचे जीवन विमा संरक्षण मिळेल आणि अन्य प्रिमियम परत केले जाणार नाही.
प्र. ११. प्रिमियमचा तपशील सांगा?
१) (ढरॠकउ२) / अन्य जीवन विमा कंपनीला प्रत्येक ग्राहक याप्रमाणे १०/- रुपये वार्षिक असे प्रिमियम राहील.
२) प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी १/- रुपये याप्रमाणे इउ/ ट्रू१ङ्म/ उङ्म१स्रङ्म१ं३ी/ अ‍ॅील्ल३ यांना खर्च देणे.
३) प्रत्येक ग्राहक याप्रमाणे दरवर्षी १/- रुपये याप्रमाणे बँकेला अस्थापना खर्च मिळेल.
प्र. १२. हे विमा संरक्षण ग्राहकाने घेतलेल्या अन्य विमा संरक्षणाच्या व्यतिरिक्त असेल काय?
होय.
प्र. १३. नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप, पूर इ. मुळे होणारे मृत्यू/ अपंगपणा या कारणांना ही योजना लागू असेल का? तसेच खून/ आत्महत्या यासारख्या घटनानां देखील ही योजना लागू असेल का?
या वरील सर्व घटना प्रधानमंत्री सुरक्षा विमा (ढटरइ) योजनेअंतर्गत कव्हर केल्या जातील.
प्र. १४. सर्व जॉर्इंट खातेधारक उल्लेख केला गेलेल्या खात्याद्वारे ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात का?
जर ते पात्रतेचे निकष पूर्ण करत असतील आणि प्रति व्यक्ती दरवर्षी रु. ३३०/- या दराने प्रिमियम (हप्ता) भरत असतील तर सर्व जॉर्इंट खातेधारक उल्लेख केला गेलेल्या खात्याद्वारे ह्या योजनेत सहभागी होऊ शकतात.
प्र. १५. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (ढटरइ) योजनेसाठी कुठले बँक खाते योग्य असेल?
संस्थांशी संबंधित खाते वगळता सर्व प्रकारच्या खात्यांचे धारक या योजनेसाठी पात्र असतील.
प्र. १६. परदेशस्थ भारतीय (एन.आर.आय.) कव्हरेज मिळण्यासाठी प्रधान मंत्री सुरक्षा विमा (ढटरइ) योजनेअंतर्गत पात्र असतील का?
कुठल्याही भारतीय बँकेच्या शाखेत योग्य बँक खाते असलेला कुणीही परदेशस्थ भारतीय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र असेल.
प्र. १७. मृत्यू अथवा अपंगत्व यातून निर्माण होणाऱ्या अपघाताचा व हॉस्पिटलायझेशनचा खर्च परत मिळण्याची कोणतीही तरतूद आहे?
नाही.
प्र. १८. ज्या खातेधारकाने नोंदणी अर्ज भरलेला आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ कोण घेऊ शकते?
ज्या खातेधारकाने नोंदणी अर्ज भरलेला आहे आणि त्याचा मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ नामनिर्देशित व्यक्तीस मिळेल. जर नामनिर्देशन केले नसेल तर कायदेशीर वारसाला मिळेल.
प्र. १९. क्लेमची किंमत कशा स्वरूपात दिली जाईल?
अपंगत्वाचा क्लेम खातेधारकाच्या बँक खात्यात भरला जाईल. मृत्यूचा क्लेम नामनिर्देशित व्यक्ती / कायदेशीर वारसाच्या खात्यात भरला जाईल.
प्र. २०. जर खातेधारकाने आत्महत्या केल्यास त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल का?
नाही.
प्र.२१. पॉलिसीतून मिळणारे लाभ घेण्यासाठी अपघाताची नोंद पोलिसांकडे करणे आणि ऋकफ दाखल करणे गरजेचे आहे का?
रेल्वे, मार्गावरील अथवा इतर वाहनांचे अपघात झाल्यास, व्यक्ती पाण्यात बुडली असल्यास, मृत्यू गुन्ह्याशी संबंधित असल्यास अपघाताची नोंद पोलिसांकडे करणे गरजेचे आहे. साप/ नाग चावणे, झाडावरून पडणे इ. घडल्यास त्वरित वैद्यकीय नोंद होणे आवश्यक आहे.
प्र. २२. जर विमाधारक हरवला असेल आणि मृत्यू झाला याची खात्री नसेल तर विम्याचा लाभ कायदेशीर वारसांना मिळेल का?
मृत्यू झाला याची खात्री झाल्यावरच विम्याचा लाभ मिळतो अथवा मृत्यू झाला असे मानल्यानंतर सात वर्षाच्या कालावधीनंतर मिळतो.
प्र. २३. जर व्यक्ती एका डोळ्याची नजर / एक हात/ एक पाय संपूर्णपणे गमावणे याशिवाय जर आंशिक अपंग असेल तर विम्याचा लाभ मिळेल का?
लाभ मिळणार नाही.
प्र. २४. प्रधानमंत्री सुरक्षा विमा (ढटरइ) योजनेच्या पॉलिसीज (धोरणे) परदेशी विमा पॉलिसीजच्या सहाय्याने सुरू झाल्या आहेत का आणि काम करत आहेत का?
भारतात अशा कुठल्याही परदेशी विमा कंपनीज थेटपणे काम करत नाहीत. विमा कायदा आणि कफऊअ नियमांनुसार भारतीय कंपनीज बरोबर काही परदेशी नवीन काम करीत आहेत. जेथे त्यांचा समभाग ४९% पर्यंतच मर्यादित आहे.
प्र. २५. क्लेम्सची पूर्तता न झाल्यास भारतातील परदेशी विमा कंपनीजवर काही कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे का?
भारतात अशा कुठल्याही परदेशी विमा कंपनीज थेटपणे काम करत नाहीत. व्याख्येनुसार त्या भारतीय विमा कंपनीज आहेत. त्या सर्व कंपनीज भारतीय कायद्याच्या आधीन आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येणे शक्य आहे.
प्र. २६. हप्त्याचे दर वाढू शकतात किंवा कंपनीज भविष्यात योजना बंद करू शकतात का?
विमा हा इतर सेवांसारखाच असतो. हप्त्याचे दर भविष्यात वाढू शकतात, २१ भारतीय विमा कंपनीत असलेल्या स्पर्धेमुळे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (ढटरइ) व्यवहार्य असेल आणि ती बंद व्हायची शक्यता कमी आहे. जर काही विशिष्ट परिस्थितीत असे काही घडलेच तर बँकेकडे इतर ठिकाणी भागीदारी करण्याचे पर्याय उपलब्ध असतात.

Web Title: How is the Prime Minister's Security Insurance Plan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.