गेल्या काही दिवसांपासून महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केलं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ केली आहे. यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. रेपो रेट वाढवल्याचा परिणाम म्हणजे कर्जाच्या EMI मध्येही मोठी वाढ होईल. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे.
होम लोनचं ईएमआयरेपो दरात वाढ झाल्यामुळे, बँका आणि हाऊसिंग फायनॅन्स कंपन्या कर्जाचे दर वाढवू शकतात, ज्यामुळे तुमचा EMI वाढेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका बँकेकडून 30 वर्षांसाठी 7.1 टक्के वर्तमान व्याजदराने 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 7.1 टक्क्यांवरून 8 टक्के झाला तर तुमचा EMI 13,441 रुपयांवरूव 14,675 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला 1234 रुपये अधिक द्यावे लागतील.
कार लोनचं ईएमआयत्याचप्रमाणे, बँकेचा कार लोनचा व्याज दर सध्या वार्षिक 7.45 टक्के आहे. जर कार लोनचा व्याजदर 7.45 टक्क्यांवरून 8.35 टक्के झाला. तर, तुमच्याकडे 5 वर्षांच्या कालावधीसाठी ₹10 लाखाचे कार कर्ज असल्यास, तुमचा EMI 20014 रुपयांवरून 20444 रुपये होईल. म्हणजेच तुमच्या ईएमआयमध्ये महिन्याला ४३० रुपयांची वाढ होईल.
पर्सनल लोन ईएमआयपर्सनल लोनवर सध्या 7.05 टक्के व्याजदर आहे. जर ते 7.95 टक्क्यांपर्यंत वाढले, तर 10 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाखांच्या होम लोनचा ईएमआय 11,637 वरून वाढून 12,106 रुपयांपर्यंत वाढेल. तुमच्या ईएमआयमध्ये महिन्याला 469 रुपयांची वाढ होईल.