Lokmat Money > बिझनेस न्यूज > कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…

कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…

रिलायन्सचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानींच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये उद्योगांची विभागणी झाली. पण आज दोघांचीही स्थिती निरनिराळी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 01:49 PM2023-03-28T13:49:41+5:302023-03-28T13:50:01+5:30

रिलायन्सचे सर्वेसर्वा धीरुभाई अंबानींच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये उद्योगांची विभागणी झाली. पण आज दोघांचीही स्थिती निरनिराळी आहे.

How reliance Anil Ambani s empire fell One brother is the richest in Asia, while the other lost his place companies default | कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…

कसं बुडालं अनिल अंबांनींचं साम्राज्य; एक भाऊ आशियातील श्रीमंत, तर दुसरा…

Anil Ambani Reliance : जेव्हा दिग्गज उद्योजक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांच्या निधनानंतर कंपनी रिलायन्सची विभागणी झाली तेव्हा अनिल अंबानींकडे (Anil Ambani) रिलायन्स इन्फोकॉम आली. तर मुकेश अंबानींना पेट्रोकेमिकल्स मिळाले. दोघांना समान वाटा मिळाला, पण आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत.

एक काळ असा होता की अनिल अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योजक होते, पण आज स्थिती अशी आहे की ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. बँकांच्या प्रचंड ओझ्याखाली असलेले अनिल अंबानी तब्बल ४९ वेळा डिफॉल्टर झाले आहेत. रिलायन्सच्या विभाजनानंतर काही वर्षे कंपनी चांगली चालली, पण नंतर अनिल अंबानी यांचं साम्राज्य कोसळत गेलं. अनिल अंबानींची आरकॉम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. कंपनीचे कर्ज वाढू लागलं. पाहूया नक्की त्यांनी कोणत्या चुका केल्या ज्यामुळे त्यांच्यावर आज ही परिस्थिती उद्भवली आहे.

वादानंतर कंपनीचं विभागणी
अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात व्यवसायावरून विभागणी झाली. मुकेश अंबानींना जुनी पेट्रोकेमिकल्स मिळाली, तर अनिल अंबानींना नवीन काळातील दूरसंचार, फायनॅन्स आणि ऊर्जा व्यवसाय मिळाला. अनिल अंबानींना रिलायन्सच्या मौल्यवान आणि नव्या युगातील कंपन्या मिळाल्या, पण ते कमाल दाखवू शकले नाहीत. अनिल अंबानी यांनी रिलायन्स टेलिकॉमच्या संदर्भात अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या, पण नियोजन नीट झाले नाही. त्यांना टेलिकॉम, पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राचा राजा व्हायचे होते, पण आज त्यांच्या कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत.

अनेक चुका केल्या
अनिल अंबानींची अवस्था अशी झाली की, कर्ज फेडण्यासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागलं. आरकॉम आणि एअरसेलचे विलीनीकरण अयशस्वी झाल्यावर कर्जाचं हे दुखणं अधिक जड झालं. २०१६ मध्ये आरकॉम आणि एअरसेलचे विलीनीकरण अयशस्वी झालं. विभागणीनंतर अनिल अंबानींना रिलायन्सच्या नफा आणि वाढ देणाऱ्या कंपन्या मिळाल्या. असं असूनही, त्यांना कंपन्यांची ग्रोथ दूर त्या वाचवताही आल्या नाही. अनिल अंबानींचं साम्राज्य कोसळण्यामागे त्यांच्या चुका आहेत.

अनिल अंबानी एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात उड्या घेत होते, पण अंमलबजावणीतील त्रुटींमुळे त्यांचे पैसे त्या व्यवसायांमध्ये अडकले. ते नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवत होते, त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढत होता. त्यानंतर कर्जही त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले. २०१९ पर्यंत अनिल अंबानींच्या कंपन्यांवरील एकूण कर्जाचा बोजा १.७३ लाख कोटी रुपयांवर पोहोचला होता.

कर्ज फेडण्यात अपयश
अनिल अंबानींच्या कंपन्या एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. २००८ मध्ये अनिल अंबानींच्या कंपन्यांचं बाजारमूल्य ४ लाख कोटींच्या पुढे गेलं होतं. २०१९ मध्ये हे मूल्य केवळ २३९१ कोटी रुपयांवर घसरलं. अनिल अंबानी बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात होते. १० वर्षांपूर्वीपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले अनिल अंबानी आता याच्या जवळपासही नाहीत. त्यांच्या कंपनीकडूनच दिवाळखोरीचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमने स्वतःला दिवाळखोर घोषित केलं.

मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यातील दरी
२००८ मध्ये, अनिल अंबानी ४५ अब्ज डॉलर्ससह जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक होते. २०१९ मध्ये, ते फोर्ब्सच्या यादीत भारतात ७० व्या क्रमांकाच्याही पुढे होते. जगातील अब्जाधीशांमध्ये त्यांचा क्रमांक १३४९ व्या क्रमांकावर होता. अनिल अंबानींकडे १.७ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. अनिल अंबानींनी त्यांच्या अनेक चुकांमुळे सर्वस्व गमावले. २०१९ मध्ये, जेव्हा अनिल अंबानींकडे १.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती शिल्लक होती, त्यावेळी मुकेश अंबानींकडे ५० अब्ज डॉलर्सची संपत्ती होती. मुकेश अंबानी आज जगातील टॉप १० श्रीमंतांमध्ये आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे ८५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. तर अनिल अंबानींचं साम्राज्य जवळपास बुडलं आहे.

Web Title: How reliance Anil Ambani s empire fell One brother is the richest in Asia, while the other lost his place companies default

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.