Join us

सेल्फ मेड उद्योगपती किती श्रीमंत? ‘डी-मार्ट’चे दमानी प्रथम, ‘झोमाटो’चे गोयल दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:16 IST

या अहवालात सर्वोच्च २०० सेल्फ मेड उद्योगपतींची यादी देण्यात आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हुरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत ‘झोमाटो’चे सीईओ दीपिंदर गोयल यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. झोमाटोचे बाजार मूल्य यंदा १९० टक्के वाढून २,५१,९०० कोटी रुपये झाले आहे. गोयल यांच्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी ‘स्वीगी’चे श्रीहर्ष मजेटी आणि नंदन रेड्डी यांचा क्रमांक लागला आहे.

हुरूनच्या अहवालानुसार, ‘स्वीगी’चे बाजार मूल्य ५२ टक्के वाढून १ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. हुरून इंडियाने जारी केलेल्या ‘मिलेनिया २०२४ सेल्फ मेड उद्योगपती’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालात सर्वोच्च २०० सेल्फ मेड उद्योगपतींची यादी देण्यात आली आहे.  

टॅग्स :झोमॅटो