Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटी वार्षिक रिटर्नमधील विक्रीचा गुंता कसा सोडवावा?

जीएसटी वार्षिक रिटर्नमधील विक्रीचा गुंता कसा सोडवावा?

कृष्णा, आताच लोकसभेच्या निवडणुका होऊन त्याचे निकाल पण जाहीर झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:22 AM2019-05-27T05:22:36+5:302019-05-27T05:22:39+5:30

कृष्णा, आताच लोकसभेच्या निवडणुका होऊन त्याचे निकाल पण जाहीर झाले.

How to solve the sale of GST annual returns? | जीएसटी वार्षिक रिटर्नमधील विक्रीचा गुंता कसा सोडवावा?

जीएसटी वार्षिक रिटर्नमधील विक्रीचा गुंता कसा सोडवावा?

- उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आताच लोकसभेच्या निवडणुका होऊन त्याचे निकाल पण जाहीर झाले. देशाच्या राजकारणाचा गुंता सुटला आहे; परंतु आता जीएसटी वार्षिक रिटर्न यातील २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षातील विक्रीचा गुंता कसा सोडवावा?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुन, जीएसटीआर-९ जीएसटी वार्र्षिक रिटर्नमध्ये करदात्याला वर्ष २०१७-८ या वर्षातील आऊटवर्ड सल्पाय अर्थातच विक्रीचा पूर्ण हिशेब द्यावा लागणार आहे. यात अनेक चुका झालेल्या आहेत. कारण वर्ष २०१७-१८ हे जीएसटीचे प्रथम वर्ष होते. अनेक चुका वर्ष २०१८-१९ या वर्षात सुधारल्या गेल्या आहेत. याला प्रमुख कारण म्हणजे जीएसटीत रिटर्न सुधारणेला वावच नाही. त्यामुळे आता वार्षिक रिटर्न भरताना या चुकांचा गुंता सोडविणे गरजेचे आहे. वार्षिक रिटर्न भरताना २०१७-१८ ची विक्री आणि २०१८-१९ मध्ये त्यांच्या सुधारणा या वेगवेगळ्या टेबलमध्ये भरावयाच्या आहेत व यातच गुंता होत आहे, तसेच जीएसटीआर-१ आणि ३-बी या रिटर्नमधील फरकाचाही या गुंत्यात वाढ झाली आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ मध्ये विक्री/सेवेची माहिती कोठे द्यावयाची आहे?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ मध्ये विक्री/सेवेच्या तपशील टेबल ४ व ५ यामध्ये द्यावे लागेल. टेबल ४ मध्ये टॅक्सेबल विक्री व सेवेची माहिती द्यावे लागेल. टेबल ५ मध्ये निलरेटेड एक्झमटेड, झीरो रेडेड, नॉन जीएसटीची माहिती द्यावी लागेल. ही माहिती वर्ष २०१७-१८ च्या विक्रीअनुसार असणे गरजेचे आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ मध्ये २०१७-१८ मध्ये विक्री/सेवेच्या रकमेमध्ये काही बदल झाल्यास व ती वर्ष २०१८-१९ या वर्षात सुधार केल्यास त्याची माहिती कोठे द्यावी?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ मध्ये वर्ष २०१७-१८ ची विक्रीची सुधारणा करून ती माहिती एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ च्या रिटर्नमध्ये दिली असेल, तर त्याची माहिती टेबल १० मध्ये द्यावी लागेल व २०१७ ते २०१८ मध्ये ज्या विक्रीचा/सेवेची रक्कम जास्त गेली असेल ती रक्कम एप्रिल २०१८ ते २०१९ मध्ये कमी केली असेल, तर त्याची माहिती टेबल ११ मध्ये द्यावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ मध्ये, माहिती देताना वही खाते व दाखल केलेले २०१७-१८ चे रिटर्नमध्ये फरक आल्यास तो फरक आता वार्षिक रिटर्नमध्ये दाखविल्यास त्याची माहिती कुठे द्यावी लागेल?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-९ मध्ये माहिती देताना वही खाते व दाखल केलेले रिटर्न यामध्ये फरक असल्यास त्याची माहिती आता वार्षिक रिटर्नमध्ये देत असल्यास ते टेबल ४ मध्ये द्यावी लागेल व वाढीव देयता उद्भवल्यास ती देयता डीआरसी ०३ द्वारे भरावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-९ मध्ये विक्री/सेवेची माहिती देताना करदात्यांनी याातून काय बोध
घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, शासनाने जीएसटीत अनेक सुधारणा करणे आवश्यक आहेत. यात वार्षिक रिटर्न, जीएसटी आॅडिटचे फॉर्म इत्यादी सुधारणा लवकर करणे गरजेचे आहे, तसेच ३० जून २०१९ च्या आधी वर्ष २०१७-१८ चे वार्षिक रिटर्न व आॅडिट कसे पार पडेल याचीच चिंता प्रत्येक करदात्याला होत आहे. आशा करूया की, नवीन सरकार करदात्यांच्या अडचणी समजून जीएसटी अधिक सोपे करील.
>अर्जुन : कृष्णा, सर्वात जास्त चुका २०१७-१८ चे जीएसटीआर-१ मध्ये माहिती बरोबर दिली आहे आणि जीएसटी ०३ बी रिटर्नमध्ये वर्ष २०१८-१९ मध्ये ती चूक सुधारली आहे, या प्रश्नाचेच उत्तर अनेक करदात्यांना सतावत आहे.
कृष्ण : अर्जुन, वर्ष २०१७-१८ हे पहिलेच वर्ष असल्याने अशा चुका खूप झाल्या आहेत व त्याचे उत्तर खालीलप्रमाणे असू शकेल-
जुलै २०१७ महिन्याची विक्री/सेवेची रक्कम २०१७-१८ च्या ३ बी मध्ये ९,००० आहे व २०१७-१८ च्या जीएसटीआर-१ मध्ये १०,००० अशी बरोबर गेली आहे; परंतु १,००० ची विक्री रक्कम २०१८-१९ च्या ३बीमध्ये दाखवली असेल, तर याचे उत्तर असेल ९,००० हजार टेबल ४ मध्ये दाखवायचे आहे. कारण त्याने करदायित्व २०१७-१८ मध्ये दाखवले आहे व रु. १,००० टेबल १० मध्ये दाखवायचे आहे. कारण त्याचे करदायित्व २०१८-१९ मध्ये केले आहे.

(सीए)

Web Title: How to solve the sale of GST annual returns?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.