Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...

पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...

Paytm : एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये देशातील सर्वोच्च ॲप मानलं जाणारे पेटीएम सध्या अडचणीतून जात असून आरबीआयच्या कारवाईनंतर युजर्सचा भ्रमनिरास झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:16 PM2024-05-14T22:16:17+5:302024-05-14T22:16:52+5:30

Paytm : एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये देशातील सर्वोच्च ॲप मानलं जाणारे पेटीएम सध्या अडचणीतून जात असून आरबीआयच्या कारवाईनंतर युजर्सचा भ्रमनिरास झाला होता.

how to activate paytm upi lite wallet for payment know step by step process  | पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...

पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...

नवी दिल्ली : आरबीआयने पेटीएमच्या (Paytm ) पेमेंट बँकेवर ताशेरे ओढले असताना, कंपनीने यूपीआय वॉलेटबाबत मोठा प्लॅन आखला आहे. एकेकाळी डिजिटल पेमेंटमध्ये देशातील सर्वोच्च ॲप मानलं जाणारे पेटीएम सध्या अडचणीतून जात असून आरबीआयच्या कारवाईनंतर युजर्सचा भ्रमनिरास झाला होता. लहान दुकानदारांपासून ते खरेदीदारांपर्यंत अनेकजण पेटीएमच्या ॲपपासून Google Pay आणि PhonePe सारख्या पर्यायांकडे जात आहेत. मात्र, आता छोट्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने मोठा डाव खेळला आहे.

पेटीएमने यूपीआय लाइट वॉलेट (UPI Lite Wallet) नावाचे एक नवीन फीचर्स सुरू केले आहे, जे युजर्सना वारंवार पिन टाकण्याच्या त्रासापासून सुटका करेल. तसेच, ते युजर्सना वापरण्यासही खूप सोपे असणार आहे. दरम्यान, UPI Lite Wallet, नावाप्रमाणेच, लाइट पेमेंटसाठी वापरले जाते. हे वॉलेट एकावेळी 2000 रुपये ॲड करण्याची सुविधा देते आणि हे दिवसातून दोनदा करता येते. म्हणजे लाईट वॉलेटमधून एका दिवसात 4000 रुपये खर्च करता येतात. हे वॉलेट लहान युजर्ससाठी खूप उपयुक्त आहे, जे दिवसभरात छोट्या खरेदीसाठी पैसे देतात.

विशेष म्हणजे, या वॉलेटद्वारे एकावेळी केवळ 500 रुपयांपर्यंत पैसे भरता येतील. मात्र, या पेमेंटसाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा पिन टाकण्याची गरज नाही. यासाठी कंपनीने ॲक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी, येस बँक यांच्याशी भागीदारी केली आहे, जेणेकरून युजर्सना चांगली सेवा मिळू शकेल. पेटीएम व्यतिरिक्त, PhonePe आणि GooglePay देखील UPI Lite Wallet सुविधा देतात.

अ‍ॅक्टिव्हेट कसे करावे हे फिचर?
- सर्वात आधी पेटीएम ॲप उघडा आणि होम स्क्रीनवर यूपीआय लाइट अ‍ॅक्टिव्हेट या ऑप्शनवर क्लिक करा.
- तुमचे बँक खाते निवडा जे तुम्हाला पैसे अॅड करण्यासाठी यूपीआय लाइटशी लिंक करायचे आहे.
- वॉलेटमध्ये ॲड करण्यासाठी रक्कम प्रविष्ट करा.
- यूपीआय लाइट अकाउंट तयार करण्यासाठी मोबाइल पिन व्हेरिफाय करा.
- यानंतर, तुमचे यूपीआय लाइट वॉलेट अकाउंट अ‍ॅक्टिव्हेट केले जाईल आणि तुम्ही पिन न टाकता पैसे ॲड आणि पेमेंट करू शकाल.

कोठे करू शकला वापर?
यूपीआय लाइट वॉलेटसह तुम्ही कोणताही QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या संपर्क यादीमध्ये समाविष्ट असलेले कोणतेही नाव निवडून यूपीआय लाइटद्वारे पेमेंट देखील करू शकता. तुम्ही यापैकी कोणत्याही ऑप्शनवर पेमेंट केल्यास तुम्हाला पुन्हा पुन्हा पिन टाकण्याची गरज भासणार नाही.

Web Title: how to activate paytm upi lite wallet for payment know step by step process 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.