Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला

'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला

Monthly Investment Plan : रश्मिका दरमहा फक्त १० हजार रुपयांची बचत करुन कोट्यधीश होऊ शकते. तर तुम्हीही हा फॉर्म्युला वापरू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:21 AM2024-11-19T11:21:29+5:302024-11-19T11:22:19+5:30

Monthly Investment Plan : रश्मिका दरमहा फक्त १० हजार रुपयांची बचत करुन कोट्यधीश होऊ शकते. तर तुम्हीही हा फॉर्म्युला वापरू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.

how to become crorepati in 30 years investment monthly rs 10000 in sip mutual fund | 'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला

'रश्मिका दरमहा १०,००० रुपये वाचवते...', या पैशात करोडपती कसं व्हायचं? काय आहे फॉर्म्युला

Monthly Investment Plan : प्रत्येक सामान्य व्यक्तीचं कोट्यधीश होण्याचं स्वप्न असतं. यासाठी खूप मेहनत आणि पैसा कमवून उपयोग नाही. तर कमावलेल्या पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही अगदी १० हजार रुपये महिन्याला कमावून देखील कोट्यधीश होऊ शकता. यासाठी आज आपण रश्मिकाचे उदाहरण समजून घेऊ. रश्मिकाचे वय ३० असून ती खासगी क्षेत्रात नोकरी करते. तिच्या पगारातून सर्व खर्च वजा करून ती दरमहा १०,००० रुपये सहज वाचवते. हे पैसे तिच्या बचत खात्यात (Saving Account) जमा होतात. मात्र, तिचे स्वप्न श्रीमंत होण्याचे असून यासाठी कशी गुंतवणूक करावी हे तिला कळत नाही. अशा परिस्थितीत रश्मिकाकडे सध्या कोणते पर्याय आहेत ते पाहू.
 
रश्मिका पुढील ३० वर्षे दरमहा १० हजार रुपये गुंतवू इच्छिते. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर बचत खात्यात पुढील ३० वर्षात रश्मिकाला फारसा फायदा होईल असे वाटत नाही. वाढत्या महागाईत उलट तिची बचत कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तिने हे पैसे म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपी (SIP) करावेत. तिचे वय ३० असल्याने ती दीर्घकाळ गुंतवणूक करू शकते. 

एसआयपीची जादू
आता आपण म्युच्युअल फंडाच्या गणितावरून समजून घेऊ की दरमहा १०,000 रुपयांच्या SIP वर किती पैसे मिळतील. जर रश्मिकाने १० हजार रुपयांची मासिक एसआयपी केली, तर SIP कॅल्क्युलेटरनुसार, तिला १० वर्षांमध्ये १२% रिटर्नवर एकूण २३,२३,३९१ रुपये मिळतील. तर १५% वार्षिक व्याजानुसार एकूण २७,८६,५७३ रुपये मिळतील. या कालावधीत रश्मिकाला १० वर्षांत एकूण १२ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

पण गुंतवणुकीचा वेळ जसजसा वाढत जातो तसतसा चक्रवाढ व्याजाची जादू पाहायला मिळते. रश्मिका २० वर्षांसाठी १०,००० रुपयांच्या मासिक एसआयपी वर १२% रिटर्नच्या दराने करोडपती होईल. तिला एकूण ९९,९१,४७९ रुपये (सुमारे १ कोटी) मिळतील. जर परतावा १५ टक्के असेल तर रश्मिकाला २० वर्षांत १,५१,५९,५५० रुपये मिळतील. रश्मिकाला २० वर्षात १० हजार रुपये दराने एकूण २४ लाख रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम ती निवृत्तीसह इतर खर्चासाठी वापरू शकते. ५० वर्षांचे झाल्यावर ही रक्कम तिच्या हातात येईल, म्हणजे तिच्याकडे निवृत्तीसाठी आणखी १० वर्षे असतील.

महिन्याला १० हजार गुंतवून करोडपती कसे व्हाल?
आता शेवटी ३० वर्षांची आकडेवारी पाहू. रश्मिकाने पुढील ३० वर्षे सतत मासिक १०,००० रुपये SIP केल्यास १२ टक्के वार्षिक व्याजाने तिला एकूण ३,५२,९९,१३८ रुपये (३.५ कोटी) मिळतील. आता १५ टक्के दराने, तुम्हाला ३० वर्षांसाठी १०,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण ७,००,९८,२०६ रुपये (७ कोटी रुपये) मिळतील. म्हणजेच रश्मिका ६० वर्षांची होईल तेव्हा तिच्याकडे ७ कोटींहून अधिक रुपये असतील.

फक्त रश्मिकाच नाही तर तुम्ही देखील SIP ची ताकद समजू शकता. फक्त १०,००० रुपयांच्या SIP वर ३० वर्षांनंतर, तुमच्याकडे सुमारे ७ कोटी रुपये असतील. या पैशात तुम्ही तुमचं म्हातारपण आरामात जगू शकता. आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर कोणी दरमहा २० हजारांची बचत करत असेल तर त्याने दरवर्षी १० टक्के बचतीची रक्कम वाढवावी. कारण उत्पन्नही वर्षानुवर्षे वाढत जाते.

Web Title: how to become crorepati in 30 years investment monthly rs 10000 in sip mutual fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.