How to book Current Ticket : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्वांनाच घरी किंवा गावी जाण्याचे वेध लागले असतील. सणासुदीला रेल्वेचं आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल होते. तत्काळमध्येही जागा मिळेल की नाही हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे करंट तिकीट. विशेष म्हणजे रेल्वे आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर तुम्ही चालू तिकीट बुक करून प्रवास करू शकता. फक्त याची प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे.
चार्ट आल्यानंतर रिक्त जागांवर बुकिंग
ग्राहक आयआरसीटीसीच्या अॅप आणि वेबसाइटद्वारे करंट तिकिटे बुक करू शकतात. रेल्वे सामान्यत: ट्रेन धावण्याच्या नियोजित तारखेच्या ३ महिने आधी रेल्वे तिकीट बुकिंग सुरू करते. त्यानंतर, तत्काळ कोट्यातील तिकीट बुकिंग ट्रेन धावण्याच्या तारखेच्या एक दिवस आधी उघडते. जर दोन्ही पर्यायात तुमचं तिकीट बूक झालं नाही. तर तुम्ही कंरट तिकीट पर्याय वापरू शकता. IRCTC वेबसाइटनुसार, करंट बुकिंग चार्ट आल्यानंतर रिकाम्या जागांवर बुकिंग केले जाते.
IRCTC अॅपवरुन चालू तिकीट कसं काढायचं?
सर्वप्रथम IRCTC अॅप उघडून तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
'ट्रेन' बटणावर क्लिक करा आणि तुमचे डेस्टिनेशन आणि सोर्स स्टेशन टाइप करा. त्यानंतर 'ट्रेन सर्च' बटणावर क्लिक करा.
निवडलेल्या मार्गावरील सर्व उपलब्ध गाड्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. तुमच्या पसंतीच्या तिकिटाच्या श्रेणीवर क्लिक करा- CC, EC, 3AC, 3E इ. निवडलेल्या ट्रेनसाठी सध्याचे तिकीट उपलब्ध असल्यास, ते 'CURR_AVBL-' म्हणून दाखवले जाईल. तुमचे तिकीट येथे बुक करा.
तिकीट बुकिंगचे प्रकार
सामान्य: तुम्ही IRCTC द्वारे सामान्य रेल्वे तिकीट बुक करू शकता. हे तिकीट जास्तीत जास्त ३ महिने अगोदर बुक केले जाऊ शकते.
तत्काळ : निवडलेल्या गाड्यांसाठी तत्काळ ई-तिकीट एक दिवस अगोदर बुक करता येतात. तत्काळ तिकिटे एसी क्लाससाठी (2A/3A/CC/EC/3E) सकाळी १०:०० पासून आणि नॉन-एसी क्लाससाठी (SL/FC/2S) सकाळी ११:०० पासून बुक करता येतात.
करंट किंवा चालू : चार्टिंग केल्यानंतर रेल्वेने दिलेल्या मर्यादीत वेळेत तुम्ही उपलब्ध असलेल्या सीटसाठई बुकिंग करू शकता. साधारणपणे, ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या सुमारे ४ तास आधी चार्ट तयार केले जातात.