Join us

तुमच्या पॅन कार्डच्या गैरवापराबद्दल कसे जाणून घ्याल? अशा प्रकारे ऑनलाइन तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 4:12 PM

PAN Card : सध्या फसवणुकीचे प्रकार अनेक वाढले आहेत. दुसऱ्याच्या पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

नवी दिल्ली : बँकिंगशी संबंधित कामासाठी पॅन कार्ड  (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. त्यात तुमच्या सर्व आर्थिक घडमोडींशी संबंधित माहिती असते, जी एक गोपनीय माहिती असते. पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहे, त्यामुळे ते अत्यंत काळजीपूर्वक ठेवावे लागते. मात्र, सध्या फसवणुकीचे प्रकार अनेक वाढले आहेत. दुसऱ्याच्या पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

अशा परिस्थितीत, आपण अधिक सतर्क असणे आवश्यक आहे. तुमच्या पॅनकार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर तुम्ही नियमितपणे लक्ष ठेवल्यास त्याचा गैरवापर टाळता येईल. दरम्यान, कोणीतरी तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करत आहे, हे तुम्हाला कसे कळेल? यासोबतच जर कोणी तुमच्या पॅनकार्डचा गैरवापर करत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेबद्दलही जाणून घ्या....

अशा प्रकारे पॅन कार्डचे ऑनलाइन ट्रान्जक्शन तपासा...तुमच्‍या पॅन कार्डद्वारे होणाऱ्या ट्रान्जक्शनची हिस्ट्री ऑनलाइन तपासण्‍यासाठी तुम्‍हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला सर्वात आधी https://www.cibil.com/ वर जावे लागेल. येथे तुम्हाला 'Get your CIBIL Score' चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. येथे दिलेल्या सब्सक्रिप्शन प्लॅनपैकी एक निवडून, तुमचा मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी इत्यादी डिटेल्स प्रविष्ट करावे लागतील.

यानंतर तुम्हाला लॉगिनसाठी पासवर्ड तयार करावा लागेल. येथे आयडी टाईपमध्ये 'इन्कम टॅक्स आयडी' निवडा लागेल. आता पॅन कार्ड नंबर टाका आणि 'Verify your identity' या ऑप्शनवर क्लिक करा. येथे काही प्रश्न विचारले आहेत, ज्यांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील. यानंतर तुम्हाला फी भरावी लागेल. आता एक फॉर्म दिसेल, ज्यामध्ये विचारलेले डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅन नंबरवर घेतलेल्या एकूण कर्ज दिसून येईल.

गैरवापराची तक्रार कशी नोंदवायची?जर तुमच्या पॅन कार्डचा कुठेतरी गैरवापर झाला असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला https://incometax.telenetglobal.com/pan/pan.asp वर जाऊन तुमचा डिटेल्स द्यावे लागतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार दाखल करायची आहे, हे देखील सांगावे लागेल. यानंतर, रिसीट नंबर इत्यादी भरून शेवटी सबमिट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदवली जाईल.

टॅग्स :व्यवसायगुन्हेगारीपॅन कार्ड