Join us

अलर्ट! तुमच्याकडे असलेली 500 ची नोट खोटी तर नाही ना?; 'अशी' पटकन करा चेक, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 5:21 PM

How to check rs 500 note real or fake : तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खोटी आहे की खरी, ही चिंता तुम्हाला सतावत असेल तर काळजी करू नका, कारण आता खऱ्या नोटेची ओळख पटवण्यासाठी काही पद्धती आहेत.

नवी दिल्ली - सध्या बाजारात खोट्या नोटांचा सुळसुळाट झाला आहे. अनेकदा घाई-गडबडीत सर्वसामान्यांच्या हातात खोटी नोट दिली जाते. खऱ्या नोटेप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या नकली नोटांमुळे फसवणूक होते. त्यामुळेच खऱ्या आणि खोट्या नोटांमधला फरक समजणं कठीण आहे. अशा वेळी अलर्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या खिशात असलेली 500 रुपयांची नोट खोटी आहे की खरी, ही चिंता तुम्हाला सतावत असेल तर काळजी करू नका, कारण आता खऱ्या नोटेची ओळख पटवण्यासाठी काही पद्धती आहेत. ज्याद्वारे तुम्ही सहजपणे सांगू शकता की कोणती नोट खरी आहे आणि कोणती खोटी आहे. याबाबत जाणून घेऊया...

- तुम्ही नोटेला एखाद्या लाईटसमोर ठेवा, त्यावर तुम्हाला 500 लिहिलेलं दिसेल.

- 500 ची नोट ओळखण्यासाठी तुमच्या डोळ्याच्या समोर 45 डिग्री अँगलवर नोट ठेवा, त्या जागी 500 लिहिलेलं दिसेल.

- नोटेवर देवनागरीमध्ये 500 संख्या लिहिलेली असते.

- नव्या नोटांमध्ये जुन्या नोटांच्या तुलनेत महात्मा गांधींच्या फोटोची दिशा आणि जागा थोडी बदलेली आहे. ते तुम्ही पाहू शकता.

- नोटेला थोडंसं दुमडल्यानंतर सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरवा ते निळा असा बदलताना दिसतो.

- नव्या नोटांमध्ये जुन्या नोटेच्या तुलनेत, गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची स्वाक्षरी, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला दिसेल.

- नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाईप वॉटरमार्कही दिसतो.

- नोटेत वरच्या डाव्या बाजूला आणि खाली उजव्या बाजूला लिहलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे झालेले दिसतील.

- नोटेवरील 500 चा रंग बदलतो. याचा रंग हिरवा ते निळा असा होतो.

- खऱ्या नोटांमध्ये उजव्या बाजूला अशोक स्तंभ दिसतो. नोटेच्या उजव्या बाजूला बॉक्समध्ये 500 लिहलेलं असतं. तसंच डाव्या आणि उजव्या बाजूला 5 ब्लीड लाईन्स असतात. ज्या उठून दिसतात.

- नोटच्या मागच्या बाजूला नोटेच्या छपाईचं वर्ष लिहिलेलं असतं.

- स्लोगनसह स्वच्छ भारतचा लोगो असतो.

- नोटेच्या मधल्या भागात भाषेचं पॅनल दिसतं.

- 500 रुपयांच्या खऱ्या नोटेवर भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचा फोटो आहे.

- देवनागरीमध्ये 500 लिहलेले असते.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :पैसा