Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेटीएम FASTag कसं कराल डिॲक्टिव्हेट किंवा पोर्ट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर 

पेटीएम FASTag कसं कराल डिॲक्टिव्हेट किंवा पोर्ट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर (PPBL) नियामक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे फास्टॅगसह पेटीएमच्या सर्व सेवांवर परिणाम होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 01:55 PM2024-02-13T13:55:24+5:302024-02-13T13:55:51+5:30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर (PPBL) नियामक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे फास्टॅगसह पेटीएमच्या सर्व सेवांवर परिणाम होणार आहे.

How to Deactivate or Port Paytm FASTag See Step by Step Procedure rbi restrictions | पेटीएम FASTag कसं कराल डिॲक्टिव्हेट किंवा पोर्ट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर 

पेटीएम FASTag कसं कराल डिॲक्टिव्हेट किंवा पोर्ट, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर 

Paytm FASTag: २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यापासून पेटीएम (Paytm) हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. लहान-मोठ्या पेमेंटपासून ते FASTag पर्यंत सर्व गोष्टींसाठी लोक पेटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. बहुतेक वाहनांमध्ये पेटीएमनं जारी केलेला फास्टॅग असतो, जो त्यांच्या पेटीएम खात्याशी जोडलेलाही असतो. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर (PPBL) नियामक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे फास्टॅगसह पेटीएमच्या सर्व सेवांवर परिणाम होणार आहे. चला तर मग आज जाणून घेऊया ज्यांच्याकडे पेटीएम फास्टॅग आहे त्यांचं काय होईल.
 

FASTag पोर्ट करता येईल का किंवा तो निष्क्रिय करावा लागेल? याशिवाय, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखादा दुसऱ्या FASTag वर कसा स्विच करता येईल? रिझर्व्ह बँकेनं ३१ जानेवारीला आदेश दिला की पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला २९ फेब्रुवारीनंतर ठेवी किंवा 'टॉप-अप' ग्राहकांची खाती, वॉलेट, फास्टॅग आणि इतर उत्पादनं स्वीकारणं थांबवावं लागेल.
 

Paytm FASTag कसा निष्क्रिय कराल?
 

१. फास्टॅग पेटीएम पोर्टलवर लॉग इन करा. यामध्ये यूजर आयडी, वॉलेट आयडी आणि पासवर्ड टाका.
२. आता फास्टॅग क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि पडताळणीसाठी आवश्यक असलेली इतर अनेक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
३. पेज खाली स्क्रोल करा आणि हेल्प अँड सपोर्ट पर्यायावर क्लिक करा.
४. आता ‘Need Help With Non-Order Related Queries?’ वर टॅप करा.
५. यानंतर फास्टॅग प्रोफाइल अपडेट करण्याशी संबंधित प्रश्नांचा पर्याय निवडा.
६. यानंतर आय वाँट टू क्लोज माय फास्टॅग पर्याय निवडावा लागेल आणि पुढील स्टेप्सचं पालन करावं लागेल.

लक्षात ठेवा एकदा फास्टॅग निष्क्रिय केल्यानंतर, तुम्ही तोच फास्टॅग पुन्हा सक्रिय करू शकत नाही.
 

पोर्ट कसं कराल?
 

१. Paytm वरून FASTag पोर्ट किंवा ट्रान्सफर करण्यासाठी, तुम्ही ज्या बँकेत तुमचा FASTag ट्रान्सफर करत आहात त्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा.
२. तुम्हाला स्विच करायची असल्याची माहिती त्यांना द्या.
३. आवश्यक माहिती द्या आणि त्यानंतर पोर्ट केलं जाईल.
पेटीएमच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या नोटीसचा वापरकर्त्यांच्या बचत खाती, वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी खात्यांमधील ठेवींवर परिणाम होणार नाही.

Web Title: How to Deactivate or Port Paytm FASTag See Step by Step Procedure rbi restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.