Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhar Card Correction : मोबाईल नंबरशिवाय कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक, जाणून घ्या ४ सोप्या स्टेप्स

Aadhar Card Correction : मोबाईल नंबरशिवाय कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक, जाणून घ्या ४ सोप्या स्टेप्स

UIDAI च्या माध्यमातून आधार कार्ड दिले जाते. UIDAI म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:10 PM2022-08-14T14:10:48+5:302022-08-14T14:11:22+5:30

UIDAI च्या माध्यमातून आधार कार्ड दिले जाते. UIDAI म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया...

How to do Aadhar Card Correction Online Without Mobile Number? | Aadhar Card Correction : मोबाईल नंबरशिवाय कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक, जाणून घ्या ४ सोप्या स्टेप्स

Aadhar Card Correction : मोबाईल नंबरशिवाय कशी सुधाराल आधार कार्डावरील चूक, जाणून घ्या ४ सोप्या स्टेप्स

Aadhaar card correction without mobile number: UIDAI च्या माध्यमातून आधार कार्ड दिले जाते. UIDAI म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया... ही भारत सरकारची संस्था आहे. आधार कार्डवर १२ अंकांचा यूनिक कोड असतो आणि त्याला आधार नंबर म्हटले जाते. आता आधार हे आपल्यासाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. इतकेच नव्हे भारतीय नागरिक असल्याचा तो पुरावाही आहे. त्यामुळे त्याच्यावरील एक चूक आपल्याला भविष्यात महागात पडू शकते..

आधार कार्डवरील एखादी चूक सुधारायची आहे, परंतु ज्यांच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर नाही. अशावेळी काय करायचं हे आज आपण जाणून घेऊया. हे काम तुम्हाला ऑफलाईन करावं लागेल, कारण तुमच्याकडे रजिस्टर मोबाईल नंबर नाही. 

चार सोप्या स्टेप्स

  • आपल्या जवळच्या आधार केंद्रावर जा आणि आधार कार्ड करेक्शन फॉर्म घ्या
  • फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा तो पुन्हा तपासा... त्याच्यासोबत आधार कार्डाच्या झेरॉक्स कॉपीसह पॅन कार्ड किंवा अन्य आयडेंटिटी कार्डची झेरॉक्स कॉपी जोडा
  • आधार केंद्रावर लागलेल्या बायोमॅट्रिक मशीनवर स्वतःचं वेरिफिकेशन करून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला अंगठ्याचं निशाण, रेटिना स्कॅन करावं लागेल. 
  • आधार केंद्रावरील संचालक तुम्हाला एक पावती देईल. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर २-३ दिवसांत आधार कार्डाशी लिंक होईल

 

ऑफलाईन तुम्हा कोणकोणत्या सुधारणा करू शकता?

  1. नाव
  2. पत्ता
  3. जन्मतारिख
  4. लिंग
  5. मोबाईल नंबर
  6. ई मेल आयडी

 

ऑनलाईन सुधारणा कशी करता येईल?
एकदा का तुमचा मोबाईल आधार कार्डाशी लिंक झाला, तर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन सुधारणा करता येऊ शकते. UIDAI च्या वेबसाईटवर लॉग इन करून तुम्हाला हवी ती सुधारणा करता येईल.  

Web Title: How to do Aadhar Card Correction Online Without Mobile Number?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.