-चंद्रकांत दडससध्या देशातील तब्बल २० सटक्के म्हणजेच १०० कोटी लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याचा अहवाल समोर आल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महागाईच्या तुलनेत पगारवाढ न होणे, अनिश्चित उत्पन्न यामुळे लोक अडचणीत सापडले आहेत. खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर काय करावे हे जाणून घेऊया....
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आपली गरज आणि इच्छा यामधील फरक ओळखा. आपला पगार आणि खर्च किती आहे याचा आढावा घ्या. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी प्रथम पैसे खर्च करा. महागडी उत्पादने, ब्रँडेड कपडे, वारंवार रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यास जात असाल तर ते टाळण्यावर भर द्या तसेच गरजेच्या वस्तू सवलतीत खरेदी करा. दैनंदिन खर्चाचा हिशोब ठेवा. आपला पैसा नेमका कुठे किती खर्च होतोय, यावर लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळल्याने महिन्याच्या बजेटमध्ये बचत करता येईल.
उत्पन्नाचे पर्याय वाढवा
जर उत्पन्न कमी होत असेल, तर त्याचे स्रोत वाढवण्यासाठी काय करता येईल ते पाहा. तुमच्या कौशल्यांवर आधारित अर्धवेळ काम शोधा.
फुकट मिळणाऱ्या कौशल्यविकास कोर्सेसचा उपयोग करून मोठ्या उत्पन्नाची संधी मिळवता येईल. ऑनलाईन फ्रीलान्सिंग, पार्ट-टाइम जॉब किंवा घरगुती व्यवसाय सुरू करा.
शेतीपूरक व्यवसाय किंवा लघु उद्योजकतेकडे वळा. शिवाय सकारात्मक दृष्टी ठेवा आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहा.
कसा काढाल मार्ग
अगदी दिवसाला १० रुपयांची बचत केली तरी वर्षाला ३,६०० रुपये हाताशी शिल्लक राहतात. त्यामुळे जवळ पैसे नसताना तसे नियोजन करा. आर्थिक संकट आले म्हणून घाबरू नका.
आयुष्यात असे अनेक चढउतार येत असतात. जवळच्या लोकांशी संवाद ठेवा आणि संकटातून मार्ग काढा. आर्थिक नियोजन करणाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन घ्या.
३ लक्षात ठेवा आर्थिक संकट हे तात्पुरते असते. त्यावर योग्य नियोजन, खर्चावर नियंत्रण, बचत आणि उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून मात करता येईल.