Join us

सोशल मीडियावर असे कमवा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 11:53 AM

...इन्फ्लुएन्सर्स म्हणून तुम्ही तुमचा लोकांवर प्रभाव पाडू शकता. इन्फ्लुएन्सर्स उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा हाेऊ शकतो.

चंद्रकांत दडस, उपसंपादकसोशल मीडियावर सध्या अनेकजण तासन् तास व्हिडीओ पाहत असलेले आजूबाजूला दिसतात. या लोकांमुळे तुम्हाला पैसे कमविण्याचे नवे साधन निर्माण होऊ शकते.  इन्फ्लुएन्सर्स म्हणून तुम्ही तुमचा लोकांवर प्रभाव पाडू शकता. इन्फ्लुएन्सर्स उद्योग सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्याचा तुम्हाला आर्थिक फायदा हाेऊ शकतो.

काय आहे संधी?अनेक ब्रँड मार्केटिंगसाठी त्यांची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला नियुक्त करू शकतात. किंवा तुम्ही त्यांच्यासोबत एकत्र काम करू शकता. किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स म्हणून तुम्ही स्वत: एक ऑनलाइन कोर्स करू शकता.

नेमके काय कराल? - सर्वात अगोदर प्लॅटफॉर्म निवडा. तुम्हाला कशामध्ये आवड आहे ते पहा. जेवण, फॅशन, प्रवास किंवा इतर काहीही जी तुमची आवड असेल त्यानुसार प्लॅटफॉर्म निवडा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या टार्गेटेड प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सोपे होते. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती गोळा करा. त्याचे बारकावे आणि अल्गोरिदम समजून घ्या.- तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुमचा ब्रँड तयार करा. - कंटेट तयार करताना योग्य दिशा ठरली असेल तर चांगला परिणाम दिसून येतो. - तुमच्यापेक्षा इतर लोकांच्या तुलनेत अधिक चांगला कंटेट असेल तर तुम्ही गर्दीतही वेगळे दिसाल. यात शिस्त आणि नियमितपणा अतिशय महत्त्वाची आहे.- तुम्ही आज, उद्या, परवा काय पोस्ट करणार आहात याचे शेड्यूल ठरलेले असावे. - संवाद कौशल्य वाढवा. - तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधा आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. - कमेंट्स, प्रश्नमंजुषा, लाइव्ह व्हिडीओ इत्यादी त्याची माध्यमे आहेत. तुमच्या प्रेक्षकांना स्पर्धा, सर्वेक्षण इत्यादींनी जोडत राहा. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेवर व्यक्त व्हा.

टॅग्स :सोशल मीडियापैसाव्यवसाय