Lokmat Money > बिझनेस न्यूज > सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

Investment: छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 09:54 AM2023-06-29T09:54:33+5:302023-06-29T09:54:50+5:30

Investment: छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे.

How to get 70 percent return in seven years? Investing in SIP is profitable | सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

सात वर्षांत 70 टक्के रिटर्न कसे मिळवाल? एसआयपीची गुंतवणूक ठरतेय फायदेशीर

 नवी दिल्ली - छोट्या छोट्या हप्त्याच्या माध्यमातून दीर्घ कालावधीत मोठा निधी जमा करण्यासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा सर्वाधिक चांगला पर्याय आहे. एसआयपी केव्हाही सुरू करता येते. जितकी जास्त वेळ यामध्ये गुंतवणूक करत राहाल तितके यातून अधिक रिटर्न मिळतील. बाजारात पडझड होत असताना यामध्ये अधिक गुंतवणूक करण्यास विसरू नका. ती एक मोठी संधी असते.

गुंतवणुकीची मॅरेथॉन दौड? : गुंतवणुकीची सफलता 
उच्च परताव्यावर नव्हे, तर दीर्घ कालावधीवर अलंबून असते.
    अवधी    गुंतवणूक    बाजारमूल्य    नफा
    ०७ वर्षे    ८.४०    १३.६४          ५.२४ 
    १४ वर्षे    १६.८०    ५२.०१    ३५.२१ 
    २१ वर्षे    २५.२०    १४३.५८    ११८.३८ 

मासिक एसआयपी  
₹१०,०००
२००२ ते २०२३ या काळातील निफ्टी ५० निर्देशांकाच्या परताव्यानुसार गणित

ॲथलेटिक्ससारखा झुंझारपणा  घसरणी काळातही एसआयपी 
सुरू ठेवल्यास बाजार सुधारतो. 
तेव्हा अधिक परतावा मिळतो.

बुद्धिबळासारखी चाल घसरणीच्या वेळी एसआयपी वाढवावी. त्यामुळे अधिक युनिट वितरित होतात.
अवधी         ३ वर्षे
    रोखली     कायम 
रोखली     १५ महिने     ०
गुंतवणूक     २.१०    ३.६० 
कॉरपस    २.६९    ४.९० 
परतावा    २८%    ३६% 
गुंतवणूक, काॅरपस लाखांत

टेस्ट क्रिकेटसारखे टिकून राहा : एसआयपीत १० वर्षे टिकल्यास बाजार कितीही घसरला तरी नकारात्मक परतावा येत नाही.
३ वर्षे    ५ वर्षे    १० वर्षे
-१६.९८%     -५.७०%     २.४८% 

हॉकीप्रमाणे गोलवर नजर 
वित्तीय लक्ष्य जवळ आल्यास डेट अथवा हायब्रीड फंडांत स्वीच करणे लाभदायक.
n त्यामुळे घसरणीच्या काळात कॉरपस घटणार नाही.
n आपले आर्थिक लक्ष्य साध्य केल्यानंतर योजनेतून बाहेर पडण्यास उशीर करू नका. अधिक लोभ धोकादायक असतो.

Web Title: How to get 70 percent return in seven years? Investing in SIP is profitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.