Join us  

महिना 65 हजारांची पेन्शन कशी मिळवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:47 PM

ऑल सिटीझन मॉडेल अनुसार गुंतवणूकदार ७५% रक्कम समभागात गुंतवू शकतात. ५० वर्षांपर्यंत असे करता येते. समभागातील गुंतवणूक केल्यास स्थिर उत्पन्नाच्या निवृत्ती साधनांच्या तुलनेत एनपीएसमध्ये अधिक परतावा मिळतो.

नवी दिल्ली : २०२२-२३ मध्ये कर बचतीच्या उद्देशाने गुंतवणूक करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च आहे. तुम्हाला निवृत्तीसाठी बचत करायची असेल आणि करही वाचवायचा असेल, तर तुमच्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) उत्तम पर्याय आहे. ऑल सिटीझन मॉडेल अनुसार गुंतवणूकदार ७५% रक्कम समभागात गुंतवू शकतात. ५० वर्षांपर्यंत असे करता येते. समभागातील गुंतवणूक केल्यास स्थिर उत्पन्नाच्या निवृत्ती साधनांच्या तुलनेत एनपीएसमध्ये अधिक परतावा मिळतो. यात वार्षिक सरासरी १२% परतावा मिळत आहे. एनपीएसमध्ये पक्वतेपूर्वी पैसे काढणे कठीण आहे. त्यामुळे निवृत्तीच्या आधी पैशांची गरज नसेल, तरच गुंतवणूक करा.

बचत हाेते अन् करही वाचतो...बचत करण्यासह करही वाचवण्यासाठी सध्या अनेक योजना बाजारात आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास योग्य परतावा तर मिळतोच यासोबत कराची मोठ्या प्रमाणात बचत होते.

नव्या कर प्रणालीतही कर सवलतरोजगारदाता कंपनी एनपीएसमध्ये योगदान देत असेल तर कर्मचारी आयकर कायदा कलम ८० सीसीडी (२) अनुसार कर सवलतीसाठी दावा करू शकतात. खासगी क्षेत्रातील कर्मचारी नवीन कर प्रणालीत मूळ वेतनाच्या १० टक्के कर वजावट घेऊ शकतात. सरकारी कर्मचाऱ्यांना १४ टक्के वजावट मिळते. स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीस त्याचे योगदान अथवा एकूण उत्पन्नाच्या २० टक्के यातील जे कमी असेल तेवढी कर सवलत मिळेल.

विभिन्न कलमान्वये कर सवलतएनपीएसमधील गुंतवणुकीवर आयकर कायदा ८० सी अन्वये १.५० लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. ८० सीसीडी (१बी) अनुसार ५० हजार रुपयांची अतिरिक्त कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. निवृत्तीच्या वेळी काढलेल्या ६० टक्के रकमेवर कोणताही कर लागत नाही. ४० टक्के रक्कम पेन्शन खरेदीसाठी वापरली जाते. पेन्शनची रक्कम करपात्र आहे. अंशत: पैसे काढल्यास २५ टक्के हिश्श्यावर कर लागणार नाही.

३ कोटी परतावा मिळण्याचे गणित  गुंतवणूकदाराचे वय : ३० वर्षेदरमहा गुंतवणूक : ५,००० रु.गुंतवणूक कालावधी : ३५ वर्षे (६५ वर्षे वयापर्यंत)अंदाजे परतावा : १२% वार्षिकएकूण गुंतवणूक : २१ लाख रु

३.०४कोटी रुपयेगुंतवणुकीवरील परतावा     

४०%एन्युटीची खरेदी

६%पेन्शनवरील अंदाजे परतावा

१.९५कोटी रुपयेनिवृत्तीच्या वेळी एकरकमी लाभ     

टॅग्स :निवृत्ती वेतन