नवी दिल्ली : आधार कार्ड हे देशातील जवळपास प्रत्येक नागरिक ओळखपत्र म्हणून वापरतो. आधार कार्डद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी सेवेचा सहज लाभ घेऊ शकता. दरम्यान, सिम खरेदी करण्यापासून तिकीट बुकिंगपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आधार कार्डचा वापर केला जातो. त्यामुळे सरकार आधार शक्य तितके सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.
यासाठी आधार जारी करणारी सरकारी एजन्सी UIDAI ने आधार लॉक नावाचे एक खास फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे बायोमेट्रिक देखील लॉक करू शकता. आधार बनवताना कोणत्याही व्यक्तीकडून बायोमेट्रिक घेतले जाते. यामध्ये चेहरा, बोटांचे ठसे आणि डोळे यांचा समावेश आहे. आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित असला तरी, तुम्ही आधार लॉकद्वारे त्याची सुरक्षा आणखी वाढवू शकता.
आधार लॉक करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, जर तुमचा आधार चुकीच्या व्यक्तीच्या किंवा फसवणुकीच्या हातात गेला. तर तो त्याचा गैरवापर करू शकेल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही खूप प्रवास करत असाल, तर आधारचे बायोमेट्रिक्स लॉक करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो आणि तुम्ही तुमचा डेटा अधिक सुरक्षित करू शकता. यामुळे आधारशी लिंक केलेले तुमचे बँक खाते इत्यादींची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचणार नाही.
आधार कसे करावे लॉक?
- यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल.
- त्यानंतर 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जा आणि Aadhaar Services वर क्लिक करा.
- यानंतर लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक वर क्लिक करा.
- त्यानंतर आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा आणि जनरेट ओटीपी वर क्लिक करा.
- यानंतर ओटीपी टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला Enable Locking Feature वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमचा आधार लॉक होईल.
- त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा आधार अनलॉक देखील करू शकता.