ayushman vaya vandana : दिवाळीपूर्वी मोदी सरकारने वृद्धांना मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० वर्षे आणि त्यावरील वृद्धांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्यास सुरुवात केली. यासाठी ज्येष्ठांसाठी 'आयुष्मान वय वंदना कार्ड' बनवावे लागणार आहे. हे कार्ड बनवल्यानंतरच ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी हे कार्ड काढण्याची प्रोसेस माहिती असणे आवश्यक आहे.
७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ कुटुंबात आधीच मिळत असल्यास. जर कुटुंबात ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांचा समावेश असेल तर त्यांना ५ लाख रुपयांचे वेगळे कव्हरेज दिले जाईल.
सरकारी कर्मचाऱ्यांचं काय?केंद्र किंवा राज्य सरकारच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तर आधीपासून कोणत्याही सरकारी आरोग्य विमा योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना दोनपैकी एक पर्याय निवडावा लागेल.
कार्ड बनवण्यासाठी काय करावे लागेल?आयुष्मान वय वंदन कार्ड बनवण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nha.gov.in/PM-JAY द्वारे अर्ज करावा लागेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला PMJAY For 70+ चा पर्याय दिसेल. ज्यामध्ये Enrol या पर्यायावर क्लिक करा.
जर व्यक्ती स्वतः अर्ज करत असेल तर लाभार्थी पर्याय निवडा आणि सर्व माहितीसह लॉग इन करा. जर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती वृद्ध व्यक्तीच्या नावाने नॉमिनेशन करत असेल तर त्यासाठी त्याला ऑपरेटरचा पर्याय निवडावा लागेल. यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड यासारखी कागदपत्रे आवश्यक असतील. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड करता येते.
तुम्ही आयुष्मान ॲपद्वारेही अर्ज करू शकतातुमच्या मोबाईलद्वारेही आयुष्मान कार्ड मिळवता येते. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत अॅप डाउनलोड करावे लागेल. अॅप उघडल्यानंतर, भाषा निवडा. यानंतर, लाभार्थी किंवा ऑपरेटर निवडा आणि लॉग इन करा. आता फॅमिली आयडी, आधार कार्ड अशी माहिती टाका. त्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्हाला कार्ड डाउनलोड करता येईल.