चंद्रकांत दडस, उपसंपादक
कार खरेदी करणे हा आर्थिक आणि वैयक्तिक दोन्ही दृष्टींनी मोठा निर्णय आहे. असे करण्यापूर्वी, खरेदीदारांनी त्यांचे बजेट, गरज आणि जीवनशैली यांसारख्या विविध बाबींचा विचार केला पाहिजे. यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवीन कार घ्यायची की जुनी कार ? यावेळी खिसा कसा सांभाळाल हे जाणून घेऊया...
तुमच्या बचतीपैकी किती रक्कम तुम्ही कार खरेदीसाठी गुंतवू शकता, याचा विचार आधी केला पाहिजे. जर तुमच्याकडे वाहन खरेदी करण्यासाठी मर्यादित बजेट असेल, तर वापरलेली कार खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
नवीन कार खरेदी केल्याने अत्याधुनिक सुविधा असतात. मात्र, असे असले तरीही यामुळे आपल्या आर्थिक स्थितीवर काय परिणाम होतो, याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण कार खरेदी केल्यानंतर बजेटवर ताण आला की आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो? दुसरीकडे, वापरलेल्या कारसाठी पैसे वाचतात आणि सहसा कमी खर्च येतो.
तुम्ही तुमची कार कशासाठी वापरणार आहात? जर तुम्ही तुमची कार ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी वापरणार असाल तर नवीन कार हा एक चांगला पर्याय असू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही तुमची कार कमी अंतरासाठी किंवा काही किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी वापरणार असाल, तर जुनी कार हा एक चांगला पर्याय असू शकतो.
जर तुम्ही काही वर्षांत कार विकण्याचा विचार करीत असाल, तर नवीन कारमध्ये गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय असू शकत नाही. जर तुम्ही कार अनेक वर्षासाठी कार ठेवण्याचा विचार करीत असाल तर नवीन काही चांगली गुंतवणूक ठरु शकते.