Lokmat Money > बिझनेस न्यूज > द्यावी कशी पेन्शन? अमेरिकेलाही टेंशन; श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण

द्यावी कशी पेन्शन? अमेरिकेलाही टेंशन; श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा एकत्र गोषवारा रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:42 AM2023-10-04T07:42:47+5:302023-10-04T07:43:12+5:30

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा एकत्र गोषवारा रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे.

How to pay pension? Tension in America too; Even rich countries are puzzled by the rising burden of pensions | द्यावी कशी पेन्शन? अमेरिकेलाही टेंशन; श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण

द्यावी कशी पेन्शन? अमेरिकेलाही टेंशन; श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण

नवी दिल्ली : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर लाखो कर्मचारी गोळा झालेले असतानाच रिझर्व्ह बँकेने एक अहवाल जारी करून जगातील अमेरिकेसारखे श्रीमंत देशही पेन्शनच्या वाढत्या ओझ्याने हैराण असल्याचे नमूद केले आहे.

विविध आंतरराष्ट्रीय अभ्यासांचा एकत्र गोषवारा रिझर्व्ह बँकेच्या अहवालात देण्यात आला आहे. त्यानुसार, जगातील प्रमुख २० श्रीमंत देशांत पेन्शनची अदायगी करण्यासाठी ७८ लाख कोटी डाॅलरची तूट आहे. हा पैसा कसा उभा करायचा हा या देशांपुढील प्रश्न आहे.

आशियातील फिलीपिन्स, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांत सरकारी खर्चाची पेन्शन आहे. मात्र, चीन, श्रीलंका, भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर या देशांनी कर्मचाऱ्यांच्या योगदानावर आधारित पेन्शन लागू केली आहे.

Web Title: How to pay pension? Tension in America too; Even rich countries are puzzled by the rising burden of pensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.