Join us

टॅक्सचे ४६ हजार रुपये कसे वाचवाल...?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:02 AM

नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली : नवीन कर प्रणालीमध्ये ७ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. परंतु, ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि जे गुंतवणूक करतात, त्यांच्यासाठी जुनी कर प्रणाली अजून चांगली आहे. मात्र, गुंतवणूक करताना केवळ परताव्याचा विचार करणे योग्य धोरण नाही. रिटर्नसोबतच गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक किती सुरक्षित आहे आणि ती आयकर वाचवू शकेल की नाही हेही पाहावे.

कर बचतीचे पर्याय काय? 

कर बचत गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. परंतु, सामान्यतः लोक मुदत ठेवी (एफडी) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी)सारख्या लहान बचत योजनांवर अवलंबून असतात. परंतु, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) हा कर बचत आणि भरघोस रिटर्न्ससाठी सर्वोत्तम पर्याय आहे. जुन्या करप्रणालीत या तिन्ही योजनांना करात सूट आहे.

ईएलएसएसची वैशिष्ट्ये 

- ईएलएसएस म्युच्युअल फंड त्यांच्या कॉर्पसपैकी किमान ८० टक्के इक्विटी वा संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात. ज्यामुळे त्यामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा तसेच जोखीमही असते. 

- ईएलएसएसमध्ये ८० सीअंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करमुक्त आहे. ज्यामुळे दरवर्षी ४६,८०० रुपयांपर्यंत कर वाचवता येतो.

ईएलएसएस, ज्यांनी दिले सर्वाधिक रिटर्न्स

क्वांट टॅक्स प्लॅन ४५%बीएनपी परिवास ईएलएसएस  ४१%एसबीआय टॅक्स अडव्हांटेज फंड २५%कॅनरा रेबेको इक्विटी टॅक्स सेव्हर   २३%पराख पारिख टॅक्स सेव्हर फंड     २९%एडलवाइज लाँग टर्म इक्विटी २०%

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :इन्कम टॅक्स